SILVER KOLHAPURI CHAPPAL WORTH ₹4 LAKH GIFTED IN KOLHAPUR WEDDING Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur : नाद करा पण कोल्हापूरकरांचा कुठे! जावयाला लग्नात दिली तब्बल दीड किलो चांदीची चप्पल, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

Kolhapur News : कोल्हापुरात लग्नसोहळ्यात वधूपित्याने जावयासाठी दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवून दिली. सुमारे ४ लाख किंमतीच्या या अनोख्या भेटीची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Alisha Khedekar

  • कोल्हापुरात जावयासाठी दीड किलो चांदीची चप्पल बनवली

  • चप्पलची किंमत सुमारे ४ लाख रुपये

  • ८ दिवसांच्या मेहनतीनंतर कारागिरांनी तयार केली कलाकृती

  • परंपरा आणि श्रीमंती यांचा अनोखा संगम दिसून आला

  • सोशल मीडियावर घटनेची जोरदार चर्चा

रणजित माजगावकर, कोल्हापूर

एकीकडे सोने-चांदीचे दर गगनाला भिडले असताना, दुसरीकडे हौसेला खरंच मोल नसतं, याचा प्रत्यय कोल्हापुरात घडलेल्या एका घटनेतून आला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच एका मुलीच्या वडिलांनी आपल्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल बनवल्याची चर्चा आहे. या चप्पलची किंमत ४ लाख इतकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील एका कुटुंबातील एका श्रीमंत वडिलांच्या लेकीचं लग्न होतं, मग काय लेकीबरोबर जावयाचीही हौस झालीच पाहिजे. याच हौसेखातर वधूपित्याने जावयासाठी चक्क चांदीची चप्पल बनवण्याचे काम सांगली जिल्ह्यातील एका सराफाकडे दिले. त्यानंतर हे काम कोल्हापूरमधील एका नामांकित चांदी कारागिराकडे सोपवण्यात आले. या कारागिराने आणि त्याच्या सहकाऱ्याने तब्बल आठ दिवस मेहनत घेऊन अगदी हुबेहूब कोल्हापुरी चप्पल तयार केली. या चप्पलची रचना पारंपरिक असून ती पाहताना खऱ्या चामड्याच्या चप्पलचीच आठवण येते.

या अनोख्या चप्पलची किंमत सुमारे चार लाख रुपये आहे. त्यासाठी सुमारे २२ हजार रुपयांची मजुरी देण्यात आली आहे. एवढ्या महागड्या चप्पलची चर्चा आता परिसरात जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, या कारागिराने याच महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी चार ते पाच किलो वजनाची चांदीची पिंपे देखील तयार केली आहेत. त्यामुळे या कारागिराच्या कौशल्याचीही सर्वत्र चर्चा होत आहे.

कोल्हापूर आणि सांगली भागात ‘धोंड्याच्या महिन्यात’ जावयाला खास भेट देण्याची परंपरा आहे. या परंपरेला जपत, पण त्यात थोडी वेगळी आणि श्रीमंती झलक आणत या कुटुंबाने चांदीची चप्पल भेट देण्याचा निर्णय घेतला. सोने-चांदीचे दर कितीही वाढले तरी हौस आणि प्रेम याला किंमत नसते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळेच ही अनोखी चप्पल सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Khopoli Tourism : थंडगार वातावरण अन् अ‍ॅडव्हेंचर, वीकेंडसाठी परफेक्ट आहेत खोपोलीतील 'ही' ठिकाणे

Marathi Actress : ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा निर्णय; राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला, नेमकं कारण काय?

साखरपुड्यानंतर गावी आला, तरुणाला टोळक्यांनी गाठलं, धारदार शस्त्रांनी सपासप वार, पहाटे नेमकं झालं काय?

Weight loss: वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, Weight Loss करत असाल तर या ४ चुका टाळा

SCROLL FOR NEXT