A heartbreaking incident took place in Buldhana where a father died of a heart attack while performing his daughter’s kanyadaan during the wedding ceremony. saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : लग्नमंडपात मुलीचं कन्यादान करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Buldhana Heartbreaking News : लाडक्या मुलीचं कन्यादान करतानाच वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात ही घटना घडली.

Nandkumar Joshi

  • सिंदखेड राजा येथील वरदडी गावात हृदयद्रावक घटना

  • मुलीचं कन्यादान करताना वडिलांचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू

  • लग्न मंडपात विधीस्थळीच कोसळले

संजय जाधव, बुलढाणा | साम टीव्ही

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात हृदयद्रावक घटना घडली. लग्नमंडपात मुलीचं कन्यादान करताना वडिलांचं हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. लग्नमंडपात कन्यादानाचे विधी सुरू होते. त्याचवेळी नवऱ्यामुलीचे वडील खाली कोसळले. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेनं अख्खं गाव सुन्न झालं.

लग्नघरी सनई चौघड्यांचा मंजूळ सूर घुमत होता. वऱ्हाडी मंडळी, पाहुणे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. लग्नमंडपात मंगलमय वातावरण असताना अचानक दुःखद घटना घडली. मुलीचा विवाह सोहळा पार पडला. नवऱ्या मुलीची काही वेळात पाठवणी होणार होती. कन्यादानाचे विधी सुरू होते. त्याचवेळी अचानक नवरीचे वडील खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

कुरूमदास कुंडलिक भुतेकर (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भुतेकर यांची कन्या नंदिनीचं लग्न नुकतंच जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असलेला प्रदीप नानोटे यांच्याशी झालं. लग्नघरात सगळीकडं आनंदाचं वातावरण होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. मंगलाष्टकं झाली आणि त्यानंतर कन्यादानाच्या वेळी अचानक कुरुमदास यांच्या छातीत दुखायला लागलं.

कन्यादानावेळीच ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. कुरुमदास यांची गेल्या डिसेंबरमध्येच बायपास शस्त्रक्रिया झाली होती. कुरुमदास यांच्या निधनानं गावावर शोककळा पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT