बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाववाडी या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव येणाऱ्या दुचाकीने रस्त्यावरील ऑटो गाडीला जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोन वाहनांमधील धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीने दिलेल्या धडकेमुळे ऑटो चक्क विरुद्ध दिशेला फिरल्याचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये पाहायला मिळतं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुचाकी आणि ऑटोचा अपघात दीपालीनगर खामगाववाडीजवळ झाला. ऑटोवाला आपल्या रिक्षातील (Rickshaw) प्रवाशांसह मुख्य रस्त्यावरून वळत असताना या रस्त्यावरुन मागून येणाऱ्या २ दुचाकीस्वारांनी या ऑटोला जोराची धडक दिली. तर या सर्व अपघाताच्या घटनेची दृश्य CCTV मध्ये कैद झाले आहेत.
पाहा व्हिडीओ -
अपघात इतका भयानक आहे की, अपघाताची दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा येईल. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र, वाहन चालवत असताना प्रत्येक वाहन चालकाने सावधानतेने वाहन चालवायला हवीत अन्यथा अशा अपघातांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे सावधानता बाळगण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.