Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि ST बसचा भीषण अपघात; 18 जखमी, एक प्रवासी गंभीर

Truck and ST Bus Accident on Mumbai Goa Highway: या भीषण अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.

Shivani Tichkule

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर महाड शहरानजीक नाते खिंड येथे ST बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात बसचे फार मोठे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

महाड शहरानजीक नाते खिंड येथे हा अपघात झाला असून या अपघातामध्ये ST बसच्या चालक वाहकासह 18 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एक प्रवासी गंभिर जखमी झाला आहे. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत.

मुंबई महाबळेश्वर ST बस महाडकडे येत कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकची भीषण टक्कर होऊन हा अपघात झाला. या अपघतामध्ये ST बसचे फार मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. महाड शहर आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतुक सुरळीत सुरु आहे. या अपघाताबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघातामध्ये चूक कोणाची हे अद्याप समोर आलेले नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर 1 तासापासून मोठी वाहतूक कोंडी

अवकाळी पावसाने (Rain) सर्वच नागरिक त्रस्त झालेत. खेड्यापाड्यात शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशात या पावसामुळे आता घाटातील वाहतूक देखील धोक्याची ठरत आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

अशात मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Express Way) गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच परशुराम घाटाचा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे. परशुराम घाटातील पर्यायी मार्ग म्हणून चाकरमान्यांनी चिरणी आंबडस मार्गावर आपली वाहने वळवली आहेत. त्यामुळे चिरणी आंबडस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT