Farmers Rasta Roko Andolan at Pandharpur and Malshiras Over Increasing Milk Price Issue Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur Milk Price Protest: रास्ता राेकाे आंदाेलन; दूध दरवाढीसाठी पंढरपूरसह माळशिरसचे शेतकरी आक्रमक

Pandharpur Milk Price Protest: पशुखाद्याचे दर कमी करावे अशी मागणी आंदाेलकांनी केली.

भारत नागणे

Milk Price Protest at Pandharpur:

दूध दरवाढीसाठी (milk price) पंढरपूर (pandharpur) आणि माळशिरस (malshiras) तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या दाेन्ही तालुक्यातील शेतक-यांनी आज (गुरुवार) ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन (rasta roko andolan) छेडले. सरकराने दूध दरासाठी प्रयत्न करावा अन्यथा आंदाेलन तीव्र करणार असा इशारा शेतक-यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे. (Maharashtra News)

दूध दरवाढीसाठी पंढरपुरात युवा सेनेचे आंदोलन

दूध दरवाढ मिळावी या मागणीसाठी उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या युवा सेनेने आज (pandharpur) पंढरपूर जवळच्या आढीव येथे रास्ता रोको आंदोलन केले. युवा सेनेचे रणजित बागल (ranjit bagal) यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतक-यांनी पंढरपूर -कुर्डूवाडी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गायीच्या दूधाला 40 तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 60 रूपये दर द्यावा अन्यथा दुग्धविकास मंत्र्यांच्या गाडीवर मुरघास टाकू असा इशारा रणजित बागल यांनी दिला आहे. यावेळी शेतक-यांनी सरकारच्या दूध धोरणाचा निषेध करत घोषणा दिल्या.

पिलीव म्हसवड महामार्गावर रास्ता राेकाे

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदाेलन छेडले. गायीच्या दूधाला प्रती लिटर 40 रूपये व म्हशीच्या दुधाला 60 रूपये दर मिळावा या मागणीसाठी पिलीव म्हसवड महामार्गावर शेतक-यांनी सकाळच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळित झाली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT