kalamb-latur highway, rasta roko aandolan saam tv
महाराष्ट्र

Rasta Roko Andolan : वीज वितरण कंपनीवर ग्रामस्थांचा राेष, कळंब-लातुर महामार्गावरील लोहटा पुर्व गावात छेडलं रास्ता रोको आंदोलन

वीज वितरण कंपनीने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आंदाेलनाची वेळ आल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News : पाणीपुरवठा योजनेचा विज पुरवठा सुरू करण्यासाठी लोहटा पुर्व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत आज (साेमवार) कळंब-लातुर महामार्गावर (kalamb latur highway) लोहटा पुर्व गावात रास्ता रोको आंदोलन छेडलं. यामुळे परिसरातील वाहतुक काही काळ ठप्प झाली. (Maharashtra News)

धाराशिव-कळंब तालुक्यातील लोहटा पुर्व गावातील गाव अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचा विज लाईन बंद असल्याने गावातील पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे गावातील पाणी पुरवठा विस्कळीत असुन टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे.

याबाबत वारंवार वीज वितरण कंपनीकडे (mahavitran) पाठपुरावा करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

आज ग्रामस्थांनी कळंब- लातुर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने लवकरात लवकर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT