Solapur Crime News : एटीएम कार्ड बदलून युवकानं नागरिकाला फसविले, पाेलिसांच्या कारवाईत आठ गुन्हे उघडकीस

युवकाकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
Solapur Crime News
Solapur Crime News saam tv
Published On

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात असलेल्या एटीएम सेंटरमध्ये कार्डची अदलाबदली करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने केलेले आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. श्रवण सतीश मिनजगी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.  (Maharashtra News)

Solapur Crime News
Tomato Price Hike : टाेमॅटाे भाव खाऊ लागताच 400 किलाेंवर चाेरट्यांनी मारला हात; पाेलिस तपास सुरु

एटीएम कार्डसंदर्भातील आरोपींचा शोध घेताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक जण सोलापूर शहरातील आसरा चौक परिसरातील थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याबाबत खात्री करून संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली.

त्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया याच्या एटीएम (atm) सेंटरमध्ये एका इसमास फसवून त्यांची नजर चुकवून एटीएम कार्डची अदलाबदली करून साथीदाराच्या मदतीने पैसे काढल्याचे सांगितले.

Solapur Crime News
PSI Success Story : वडिलांचे कष्ट पाहून 'खुशबू' झाली व्यथित... मार्ग दिसला अन् 'बरैय्या' बनली फाैजदार (पाहा व्हिडिओ)

त्याशिवाय आणखी ७ ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अशी माहिती पोलिसांनी (police) दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com