Sangli , drought, rasta roko aandolan saam tv
महाराष्ट्र

Sangli News : शेकडाे शेतक-यांसह भाजपच्या माजी आमदाराने राेखला विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग; कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर लक्ष

पूर्वभागातील 65 गावांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे.

Siddharth Latkar

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज जत तालुक्यातील भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप (former mla vilasrao jagtap) यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि नागरिकांनी विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर (guhagar vijapur national highway) रास्ता रोको आंदाेलन छेडले. या आंदाेलनामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. (Maharashtra News)

65 गावांची पाण्यासाठी भटकंती

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पाण्याच्या तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केलेल्या नाहीत. जे पीक थोड्याफार प्रमाणात आले आहे, ते आता पाण्याअभावी वाळून जात आहे. पूर्वभागातील 65 गावांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे.

कर्नाटकाने पाणी द्यावे

त्यातच पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढत आहे. त्यामुळे जत तालुक्याला शेजारच्या कर्नाटक राज्यातील तुबची बबलेश्वर सिंचन योजनेतुन कर्नाटकाने पाणी सोडावे,अशी मागणी जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत (mla vikram sawant) यांनी नुकतेच केले आहे. यासाठी कर्नाटकच्या बंगळुरू येथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांची आमदार सावंत यांनी भेट देखील घेतली आहे. त्याबाबत अद्याप काेणतीच कार्यवाही झालेली नाही.

रास्ताे राेकाे आंदाेलन

दरम्यान आज जत (jat) तालुक्यात दुष्काळ (drought) जाहीर करावा या मागणीसाठी जत तालुक्यातील भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात शेकडाे शेतक-यांसह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

SCROLL FOR NEXT