Farmers Protest Saam Tv
महाराष्ट्र

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

Pune Bengaluru Highway Blocked: ऊस दरवाढीसाठी कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. सलग तिसऱ्या दिवळी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला.

Priya More
  • पुणे -बंगळुरू महामार्गावरील शेतकरी आंदोलनाचा आज तिसरा दिवस

  • ऊसाला ४५०० रुपये पहिली उचल देण्याची शेतकऱ्यांची मागणी

  • शेतकरी आंदोलनामुळे एसटीच्या १६६ फेऱ्या रद्द

  • गोकुळ दूध विक्रीवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम

रणजित माजगावकर, कोल्हापूर

ऊस दरवाढीसाठी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी पुणे- बंगळुरू महामार्गावरील वाहतूक रोखली आहे. शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. ऊसाला ४५०० रुपयांची पहिली उचल मिळावी या प्रमुख मागितीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असली तरी या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या आंदोलनाचा फटका परिवहन विभाग आणि गोकुळच्या दूध विक्रीला बसला आहे.

एसटी महामंडळाचे ५ कोटींचे नुकसान -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाचा फटका आता एसटी महामंडळाच्या परिवहन विभागालाही बसलाय. ऐन दिवाळीच्या हंगामात कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल १६६ एसटी फेऱ्या रद्द करण्याची वेळ परिवहन विभागावर आली आहे. यामुळे एसटी महामंडळाचं जवळपास ५ कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असतानाच फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऊस दर आंदोलनाचा परिणाम आता केवळ साखर कारखाने आणि वाहतुकीपुरता मर्यादित न राहता सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवरही झाला आहे.

गोकुळच्या दूध विक्रीला फटका -

पुणे- बंगळुरू महामार्गावर सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाचा फटका आता गोकुळ दूध संघालाही बसू लागला आहे. मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या गोकुळच्या दूध विक्रीवर तब्बल ५० टक्के परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. महामार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने गोकुळचे अनेक दूध टँकर रस्त्यातच अडकून पडले आहेत. हे टँकर वाहतूक कोंडीतून बाहेर काढून मार्गस्थ करावेत, अशी मागणी गोकुळ प्रशासनाने पोलिस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, अद्यापही टँकरची वाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील दूध विक्रीवर थेट परिणाम झाला आहे. आंदोलन असंच सुरू राहिल्यास मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये होणारा दूध पुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस दर आंदोलनाचा परिणाम आता दूध वितरण व्यवस्थेवरही जाणवू लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

Famous Singer : घटस्फोटाच्या ६ वर्षांनी प्रसिद्ध गायिका बांधणार दुसरी लग्नगाठ, होणारा नवरा आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT