Shaktipeeth Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; लातूर, धाराशिवमध्ये आंदोलन, सोलापुरातही शेतकरी आक्रमक

latur Dharashiv Solapur News : विदर्भातून गोवापर्यंत जाणारा हा ८०० किलोमीटरचा महामार्ग आहे. तर हा महामार्ग राज्यातल्या बारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shaktipeeth Mahamarg : नागपूर ते गोवा असा ८०० किलोमीटरचा असलेला शक्तिपीठ महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जात आहे. मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांमधून होत असलेला विरोध कायम आहे. या महामार्गामुळे लातूर जिल्ह्यातील जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रावर वरून जाणार असून शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार धाराशिवमध्ये देखील आंदोलन करण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातून विरोध करत हा महामार्ग दुसरीकडून नेण्याची मागणी होत आहे. 

विदर्भातून गोवापर्यंत जाणारा हा ८०० किलोमीटरचा महामार्ग आहे. तर हा महामार्ग राज्यातल्या बारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आहे. लातूर जिल्ह्यातील ३५ ते ४० गावामधून हा महामार्ग जाणार आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील जवळपास ५०० हेक्टर शेत जमीन बाधित होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन जात आहेत. त्यामुळे मराठवाडा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आज ठीक ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहेत.

धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा विरोध
धाराशिव
: राज्यभरात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही बाधित शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केला आहे. महामार्गाची गरज नसताना शेतकऱ्यांवर हा महामार्ग का लादला जात आहे? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. बाधित शेतकरी आंदोलनाला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. 

महामार्ग दुसरीकडून करण्याची होतेय मागणी

सोलापूर : बहुचर्चित असणारा शक्तिपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरातून जाणार आहे. या भागात धरणग्रस्त, बाधित लाभ क्षेत्र असल्याने शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तर महामार्ग दुसरीकडून घेऊन जावे, अशी मागणी केली आहे. त्यातच आता शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन होणार असल्याने शेती जाणार आहे. शक्तिपीठ महामार्गास वेगवेगळ्या जिल्ह्यातून विरोध होत असतानाच सोलापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

रास्ता रोकोचा दिला इशारा 

सोलापुरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने जर यावरती तोडगा काढला नाही; तर शेती मोजण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याला शेतात पाऊल ठेवू देणार नाही. तसेच पुढील काळात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT