Ambajogai News : चोरी करायला आले; सायरन वाजताच चोरट्यांची पळता भुई थोडी, घटना सीसीटीव्हीत कैद

Beed news : बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये चोरट्यांची दहशत पसरत आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. या अनुषंगाने अंबाजोगाई शहरातील विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अन् सायरन बसवण्यात आले
Ambajogai News
Ambajogai NewsSaam tv
Published On

बीड : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे चोरी करून पसार होत असतात. दरम्यान अंबाजोगाईमध्ये चोरीच्या उद्देशाने चोरटे घराजवळ दाखल झाले. मात्र याच वेळी सीसीटीव्हीचा सायरन वाजला. या सायरनचा आवाज आल्याने चोरीच्या तयारीत असणाऱ्या चोरट्यांच्या टोळीने घटनास्थळावरून पळ काढून धूम ठोकली. चोरट्यानी धूम ठोकतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.

बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये चोरट्यांची दहशत पसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. या अनुषंगाने अंबाजोगाई शहरातील विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अन् सायरन बसवण्यात आले आहेत. याचा फायदा रहिवाशांना होत असल्याचे काळ रात्रीच्या घटनेवरून लक्षात येत आहे. अर्थात सीसीटीव्हीचा सायरन वाजल्यामुळे चोरीची घटना टाळली आहे. 

Ambajogai News
Lakhandur News : बोगस कंपनी व्यवसाय करून १ कोटींची फसवणूक; लाखांदुरमधून चार जण ताब्यात

पाच चोरट्यांच्या टोळीने ठोकली धूम 
अंबाजोगाई शहरातील दुर्गा नगर एलआयसी रोड या ठिकाणी २३ जानेवारीच्या पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास पाच चोरांची टोळी आली होती. ते चोरी करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत होते. परंतु कॉलनीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सायरन वाजल्यामुळे त्यांनी लगेच धूम ठोकली. कॅमेरा क्रमांक दोन आणि कॅमेरा क्रमांक तीन मध्ये हे पाचही चोर दिसून येत आहेत. 

Ambajogai News
Buldhana : प्रतिज्ञापत्रात मुलांची माहिती लपविणे पडले महागात; शिक्षक दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई

गावकऱ्यांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला
धाराशिव
: धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबायचं नाव घेत नाही. यातच तुळजापूर तालुक्यातील किलज येथील गावकऱ्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरात चोरी करण्यासाठी दबा धरून बसलेल्या चोरट्याला पकडुन चांगलाच चोप दिला. दरम्यान यातील दोघेजन पळुन गेले आहेत. तर एकाला गावकऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर त्याला नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. किलजसह परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनीच बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com