Dhananjay Munde saam tv
महाराष्ट्र

Beed Farmer: बीड जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून लागलेली ओळख धनंजय मुंडे पुसणार?

Beed News: कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा

विनोद जिरे

Beed News Today: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्यात बीड जिल्ह्याची ओळख पडली आहे.. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, अतिवृष्टी अशा एक ना अनेक समस्याने नैराश्यात आलेला शेतकरी आत्महत्या करतोय. मात्र आता इतिहासात पहिल्यांदाच बीड जिल्ह्याला धनंजय मुंडे यांच्या रूपाने कृषिमंत्री पद मिळालं आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.  (Latest Marathi News)

आज बियाणाला मोठा भाव आहे. पिकाला हमीभाव नाही. जिल्ह्यात अपुरा पाऊस झालाय. त्यामुळं आज शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलीय. अगोदरचं उसनवारी करून पैसे आणलेत आता पैसे आणावे कुठून..? आज अतिवृष्टीचे अनुदान नाही. पीकविमा मिळाला नाही. सरकार आणि शासन फक्त घोषणा करतंय. मात्र शेतकऱ्यांच्या (Farmer) पदरात काहीच पडत नाही.

त्यामुळं शेतकरी आत्महत्या होत आहेत. अशा व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं आमच्या शेतमालाला हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. दरम्यान यामुळं आता शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणार का? आणि बीड (Beed) जिल्ह्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून लागलेली ओळख धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पुसणार का ? हेचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT