Pune Fire News: पुण्यातील कोंढवा परिसरात गॅस पाइपलाईनला भीषण आग; अग्निशमन दलाचे ५ बंब घटनास्थळी

आगा वेगाने वाढत चालल्याने रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Pune Fire News
Pune Fire NewsSaam Tv
Published On: 

Pune News: पुण्यातील साळूंके विहार परिसरात आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड (एमएनजीएल)च्या गॅस पाईपलाईनला भीषण आग लागली आहे. ही आग वेगाने वाढत चालल्याने रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (Latest Pune Fire News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आग लागल्याची माहिती समोर येताच एमजीएनलची एक तुकडी आणि अग्निशामक दल घटनास्थाळी दाखल झाले. अग्निशामक दलाची एकून ५ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. तसेच २ टँकर देखील आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत.

Pune Fire News
Solapur Crime News : एटीएम कार्ड बदलून युवकानं नागरिकाला फसविले, पाेलिसांच्या कारवाईत आठ गुन्हे उघडकीस

गॅस पाईपलाईनला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र परिसरातील काही वाहनांचे आगीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आगीमुळे आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अग्मिशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलं आहे.

माणसांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आग लागल्याने येथे वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. तसेच अधिक काळजी म्हणून सांळुके विहार परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत केला आहे.

Pune Fire News
Greater Noida Galaxy Plaza Fire: दिल्लीमध्ये गॅलक्सी मॉलला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी तिसऱ्या मजल्यावरुन मारल्या उड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com