farmers morcha in pandharpur to support ncp leader abhijeet patil saam tv
महाराष्ट्र

Abhijeet Patil : राजकीय सूडभावनेने अभिजीत पाटलांवर कारवाई, राज्य सहकारी बॅंकेचा शेतकऱ्यांकडून निषेध

यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी राज्य सहकारी बँक आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

भारत नागणे

Pandharpur News :

पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे (vitthal sahakari sakhar karkhana) अध्यक्ष अभिजित पाटील (ncp leader abhijeet patil) यांच्या समर्थनार्थ आज (गुरुवार) साखर कारखान्याच्या सभासद व कामगारांनी बॅंकेच्या विरोधात आंदोलन (aandolan) केले. यावेळी आंदाेलकांनी बॅंकेच्या कारवाईच्या पत्राची होळी करत निषेध केला. (Maharashtra News)

पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील व त्यांच्या संचालक मंडळावर राज्य सहकारी बँकेने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. बॅंकेने केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ व अभिजीत पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर तालुक्यातील शेकडो शेतक-यांनी आज एकत्रित येत कारखान्यावर आंदोलन केले.

थकीत रक्कम वसूल करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला. या कारवाईचे तालुक्यात पडसाद उमटले आहेत. बॅंकेला हाताशी धरून राज्य सरकारने राजकीय सुड बुध्दीने ही कारवाई केली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही कारवाई तातडीने मागे घ्यावी अन्यथा या कारवाईच्या विरोधात संचालक मंडळासह शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्के व वकील दिपक पवार यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT