Maharashtra Rain  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain : पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला पावसाचा तडाखा; जगाच्या पोशिंद्याला फटका, राज्यातील अवकाळी पावसाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra Rain update : पश्चिम महाराष्ट्र, कोकणाला अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. अवकाळी पावसामुळे जगाच्या पोशिंद्याला फटका बसला आहे.

Vishal Gangurde

पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा तडाखा पहायला मिळत आहे. तर, सांगली, सोलापुरात आज पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे.

अवकाळी पावसाने टरबुजाची बाग मातीमोल

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातही अवकाळी पावसाचा फटका बसलाय. तालुक्यातल्या राळेरास गावात टरबुजाची बाग मातीमोल झाली आहे. एकीकडे जिल्ह्यात तापमान चाळिशीपार गेल्यामुळे फळपिकांना तग धरणं कठीण झालं होतं. आता अचानक आलेल्या पावसामुळे टरबूज बाग आडवी झाली आहे.

सांगलीत वादळी वाऱ्यासह पाऊस

अवकाळी पावसाने सांगली शहराला चांगलाच फटका बसलाय. सकाळपासून उन्हाचा तडाखा असताना अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. या वादळी वाऱ्याची तीव्रता एवढी होती की, अनेक झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या.

शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका

सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका हा द्राक्षबाग शेतीला बसलेला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा जमीनदोस्त झाले आहेत तर काही ठिकाणी तयार झालेल्या द्राक्ष घडांसह द्राक्ष बागा कोसळल्या आहेत

पुण्यात तापमानाचा उच्चांक

पुण्यात उन्हाने तापमानाचा उच्चांक गाठलाय. पुढील दोन ते तीन दिवस तापमान स्थिर राहून त्यानंतर कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होतोय. शहरात मंगळवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आलं आहे.

रत्नागिरीत अवकाळी पाऊस

रत्नागिरीत मंगळवारी रात्री जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह पाली, खानू, वळके, चरवेली या बागात पाऊस झाला...महामार्गावर चिखल झाला असून अवकाळीचा फटका आंबा, काजूला बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! नवीन मॉडेल्सच्या लाँचनंतर iPhone 17, iPhone 16 आणि iPhone Air महागले

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

SCROLL FOR NEXT