
पोलिसांच्या ताब्यात हा जो इस्त्रीच्या कडक कपड्यांमध्ये दिसतोय. तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर. तेलंगणातून मुसक्या आवळल्यानंतर प्रशांत कोरटकरला मागच्या दाराने कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं...याच वेळी शिवप्रेमींच्या भावनांचा कडेलोट झालाय.. तर शिवप्रेमींनी कोरटकरवर चिल्लर फेकल्याचंही समोर आलंय. एवढंच नाही तर मस्तवाल कोरटकरला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप करत कोल्हापुरी पायताण दाखवलंय..
छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्यानंतर कोरटकर तब्बल 30 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता...मात्र पोलिसांनी तेलंगणातून प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आलं..मात्र मस्तवाल कोरटकर पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? पाहूयात..
25 फेब्रुवारी
शिवरायांचा अवमान आणि इंद्रजीत सावंतांना धमकी
26 फेब्रुवारी
पोलीस बंदोबस्त असतानाही कोरटकर पसार
28 फेब्रुवारी
कोरटकर मध्यप्रदेशात गेल्याच्या दाव्यानंतर पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू
22 मार्च
कोरटकर दुबईला पळाल्याची चर्चा, पोलिसांकडून लूक आऊट नोटीस जारी
23 मार्च
कोरटकरचा पीए परीक्षित तेलंगणात दिसल्याने त्यादिशेने तपास
24 मार्च
रेल्वे स्टेशन परिसरात सर्च ऑपरेशन करत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळेच शिवप्रेमींच्या संतापाचा कडेलोट झालाय. लोकभावना एवढी तीव्र असताना चिल्लर कोरटकरला इस्त्रीचे कपडे कुणी पुरवले? शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरवर पोलीस मेहेरबान आहेत का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेत.. त्यामुळे पोलीस तपासात कोरटकरला कुणी मदत केली त्यांची नावं पुढे येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.