Beed: पिकविम्यासाठी 100 गावखेड्यातील शेतकरी आक्रमक विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: पिकविम्यासाठी 100 गावखेड्यातील शेतकरी आक्रमक

बीड तालुक्यातील जवळपास 100 गावांमध्ये शेतकऱ्यांनी एकाचवेळी आक्रोश आंदोलन सुरू .

विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे (farmers) अतिवृष्टी, गारपीठीने मोठं नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप 2020 चा पीकविमा (Crop insurance) देण्यात आला नाही. 2021 च्या पिकविम्यापासून बीड (Beed) तालुक्यातील 4 हजार 965 शेतकरी अद्याप वंचित आहेत. त्यामुळे 2020 चा पीकविमा सरसगट देण्यात यावा, 2021 च्या पिकविम्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा. (Farmers in 100 villages aggressive crop insurance)

हे देखील पहा-

या मागणीसाठी धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली, बीड तालुक्यातील नाळवंडी, घाटसावळी, जरूड, पिंपळनेर, ताडसोन्ना, कुक्कडगाव, ढेकनमोहा, पोथरा, चिंचोली, भाटसांगावी, पिंपरगव्हान, बाभळवाडी, मैंदा, पोखरी, बेलवाडी यासह जवळपास 100 गावांमध्ये (villages), एकाचवेळी शेतकऱ्यांकडून आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. पिक विम्याचे अर्ज करताना शेतकऱ्यांनी ऑनलाइन (Online) अर्ज केले होते. यावेळी बराच गोंधळ निर्माण झाला होता. ऑनलाइन- ऑफलाइनच्या गोंधळ झाला होता. शेवटी शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनचा (administration) भाग म्हणून तलाठी ग्रामसेवक यांच्याकडे पिक विम्याचे अर्ज दिले होते.

पिक विमा योजनेच्या दाव्याची आठवण करून देण्यासाठी आज ग्रामपंचायत (Gram Panchayat) तसेच तलाठी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी हे आक्रोश आंदोलन केले आहे. यावेळी पिकविम्यासाठी प्रचंड घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे,असा इशारा धनंजय गुंदेकर यांनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

Maharashtra Live News Update: बीडमध्ये मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव आमने-सामने

Jio OTT Plans: स्वस्तात धमाल! जिओचे ३ स्वस्त OTT प्लॅन, फक्त १०० रुपयांत ९० दिवस एंटरटेनमेंट

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT