Ashwini Dhapse/MPSC विनोद जिरे
महाराष्ट्र

कौतुकास्पद : शेतकऱ्याच्या मुलीची MPSC परीक्षेत बाजी; क्लास न लावता मिळवला प्रथम क्रमांक

अश्विनी धापसे ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून, वडील बालासाहेब धापसे हे कोरडवाहू शेती व काही काळ पारंपरिक मेंढपाळ करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

विनोद जिरे

बीड : ध्येय गाठण्यासाठी जिद्द अन् चिकाटी असेल, तर यशाला गवसणी घालण्यापासून कोणीचं रोकू शकत नाही. असचं काहीसं बीडच्या शेतकरी कन्येनं करून दाखवून दिलंय. कोणतेही क्लास न लावताना, सेल्फ स्टडी करत MPSC मध्ये घवघवीत यश संपादन केलंय. विशेष म्हणजे एनटीसीमधून ही शेतकरी कन्या, मुलींमध्ये राज्यातून प्रथम आली आहे. अश्विनी बाळासाहेब धापसे, असं घवघवीस यश संपादन केलेल्या शेतकरी कन्येचं नाव आहे.

बीडच्या (Beed) धारुर तालुक्यात असणाऱ्या अंजनडोह येथील, अश्विनी धापसे ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून, वडील बालासाहेब धापसे हे कोरडवाहू शेती व काही काळ पारंपरिक मेंढपाळ करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. जेमतेम आर्थिक परिस्थिती नसतानाही, मुलांनी शिकावं ही त्यांची खुप इच्छा आहे. त्यासाठी ते रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आहेत.

अश्विनी धापसे (Ashwini Dhapse) हीने 10 वी पर्यंतचे शिक्षण गावातीलच शाळेतचं झाले आहे. तर कोल्हापूर येथून अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण केले. त्यांनतर औरंगाबाद येथे बंधु योगीनंद यांच्या सोबत राहून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीएससी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे कोणतेही क्लास न लावता, सेल्फ स्टडी केली. यादरम्यान 2019 ला परीक्षा झालेल्या महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परिक्षेची गुणवत्ता यादी, नुकतीच जाहीर करण्यात आलीय. यामध्ये एनटीसी मुलींमधून अश्विनी धापसे महाराष्ट्र राज्यातून मुलींमध्ये प्रथम आली आहे. यामुळे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे तीचे व कुटुंबाचे स्वप्न साकार होणार आहे.

दरम्यान धारुर तालुक्यातील अंजनडोह या एका छोट्याशा गावातील मुलीने नेत्रदीपक यश संपादन केल्याने अश्विनीने धारुर तालुक्याची व अंजनडोह या आपल्या गावाची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर अधिकारी बनू पाहणाऱ्या गावखेड्यातील मुलांमुलींसमोर एक आदर्श निर्माण केलाय.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT