Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण नॉट रीचेबल

या कटकारस्थानामध्ये एक सरकारी वकील व एसपी यांच्यासह एका नेत्याचाही समावेश असल्याचा गौप्यस्फोट केला होता.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
Published On

पुणे : काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर मोक्का लावण्याचा कट सरकारी वकील आणि एसपी करत असल्याचा आरोप केला. पेनड्राईव्ह मधून या आरोपाचे त्यांनी पुरावेही सादर केले. या कटकारस्थानामध्ये एक सरकारी वकील व एसपी यांच्यासह एका नेत्याचाही समावेश असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच स्पष्ट नावं घेतले आहे.

कालपासून राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan)) यांनी सुरुवातील माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. पण या प्रकरणी वातावरण तापल्यानंतर प्रवीण चव्हाण त्यांच्या कार्यालयातून निघून गेले. त्यांचे निवास्थान हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुण्यातील मोदी बागेच्या शेजारील इमारतीमध्ये आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा 'पेन ड्राईव्ह बॉम्ब', जळगाव विद्याप्रसारक मंडळ वादावरून आरोप

प्रवीण चव्हाण हे सकाळपासून त्यांच्या घरी नाहीत.आणि ते त्यांच्या कार्यालयातही नाहीत. त्यांना फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते फोनही घेत नाही. पण काही वेळाने ते नॉट रिचेबल आहेत. या प्रकरणाने राज्यातील राजकारण आता ढवळून निघाले आहे.

महाजनांवर मोक्का लावण्याचा कट : देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधक संपवण्याचे षड्यंत्र सरकार करत असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केला. आपले विरोधक संपवण्याचे षड्यंत्र सरकार करत असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्देश सफल होणार नाही. मी हा पेन ड्राईव्ह अध्यक्षांना आज देत आहे. यामध्ये सरकार कटकारस्थाने कशी शिजवत आहे हे आहे, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीसांनी एसपी आणि सरकारी वकील यांनी ठरवलेला अख्खा प्लान वाचून दाखवला.

पुण्यातील मराठा शिक्षण मंडळाच्या वादात भोईटे गटाच्या वतीने गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक यांनी पाटील गटाला किडनॅप केले, अशी खोटी केस केली दाखल करा. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मोक्का लागला पाहिजे, अशी कागदपत्रे द्या, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे.

Edited by- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com