Rains
Rains  Saam TV
महाराष्ट्र

Unseasonal Rains: शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला; अवकाळी पाऊस, गारपीटीनं उभी पिकं आडवी

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Rains : छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळीने हिरावला आहे.

जिल्ह्यात रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कुठे हलका तर कुठे मोठ्या सरींची हजेरी लावली. या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. पैठण, गंगापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी, कांदाचे मोठे नुकसान आहे.

पुणे

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसासोबत गारपीटीनंही झोडपून काढलं आहे. सध्या कांदा, गहू, ज्वारी पिकांची काढणी सुरु असताना अचानक पावसाने हजेरी लावली.अवकाळी पाऊस, गारांमुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली.  (Latest Marathi News Update)

नाशिक

नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील १९१ गावं अवकाळीने बाधित झाली असून सुमारे २ हजार ६८५ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका गव्हाला बसला असून १ हजार ८०३ हेक्टरवरील गहू पिकाचं नुकसान झालं आहे. तर ७७५ हेक्टर द्राक्षाचे आणि ६५ हेक्टरवरील कांद्याचं नुकसान झाले आहे. तसेच ३७ हेक्टरवरील भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. कृषी विभागां ही प्राथमिक आकडेवारी जारी केली आहे. काही ठिकाणी पावसासोबत गारपीटही झाली आहे.

जालना

जालना जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. भोकरदन, बदनापूर, जाफराबाद तालुक्यात जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे गव्हाच्या पिकांसह कांदे, हरबरा पिकाला मोठा फटका आहे.

बुलढाणा

जिल्ह्यात अनेक भागात कमी जास्त प्रमाणात अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटसह हजेरी लावली. या पावसाने शेतात उभी असलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. यात ज्वारी, गहू, कांदा पिकांना मोठा फटका बसलाय. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच रब्बी हंगामातील पिके काढण्याच्या वेळी अवकाळी पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस आणि गारा पडल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

SCROLL FOR NEXT