Pandharpur , Nira Ujwa Kalwa saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : पाणी आमच्या हक्काचं... नीरा कालव्याचे पाणी शेतक-यांनी वळविले; NCP चा अधिका-यांना इशारा

तीन डी फाट्यावरुन आंदाेलन.

भारत नागणे

Pandharpur : नीरा उजवा कालवा (nira ujwa kalwa) तीन डी फाट्याला पाणी सोडावे या मागणीसाठी राष्ट्रवादीचे काॅंग्रेसच्या (ncp) वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदाेलनाप्रसंगी शेतक-यांनी तीन डी फाट्याला पाणी मिळावे यासाठी व्हाॅल्व्ह फिरवून अधिका-यांचा निषेध नाेंदवला.

सध्या नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी (farm) पाणी सुरू आहे. दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आदेशा नुसार अधिका-यांनी तीन‌ डी फाट्याला सुरू असलेले पाणी अचानक बंद केले होते. यामुळे शेतीला पाणी मिळू शकले नाही.

तीन डी फाट्याचे पाणी अचानक बंद केल्याने शेतकरी (farmers) संतप्त झाले होते. त्यांनी तीन डी फाट्याला पाणी सोडावे अशी मागणी केली. तसेच शेतक-यांनी तीन डी फाट्याला पाणी साेडावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस अरूण आसबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

यावेळी शेतक-यांनी स्वत:हून व्हाॅल्व्ह फिरविला. तसेच तीन डी फाट्याला साेडले. आगामी काळात पुन्हा तीन डी फाट्याचे पाणी अधिका-यांनी बंद केल्यास राष्ट्रवादी त्याला शेतक-यांसमवेत चाेख उत्तर देईल असा इशारा पदाधिका-यांनी दिला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: दिवाळीत ठाकरेंनी बॉम्ब फोडला, नाशिकमध्ये भाजपला धक्का; २ दिग्गज देते 'मशाल' पेटवणार

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर RO-KO मैदानात; ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी कुलदीप OUT हर्षित IN

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

SCROLL FOR NEXT