Accidnet Saam tv
महाराष्ट्र

दुर्दैवी! महामार्गावर पायी चालणारा शेतकरी पिकअप वाहनाच्या धडकेत ठार

पिकप चालकाने मागून धडक देत अंगावर चढवत फरफटत नेले शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - धुळे (Dhule) सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मासलीपाडा शिवारात बर्डीपाडा येथील सुदाम गावित शेतकरी (Farmer) आपल्या शेतात पायी चालत जात असताना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकपने धडक दिल्याने शेतकरी सुदाम गावित यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की सुदाम जोलक्या गावित वय 50 राहणार बर्डीपाडा यांचे शेत महामार्गाच्या पलीकडे मासलीपाडा शिवारात असल्याने सकाळी आपल्या शेतात कामानिमित्त जात असताना सुरत हुन धुळे कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहन चालकाने खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या कडेने पायी चालत जाणारे शेतकरी सुदाम गावित यांना मागून जबर धडक देत पिकप वाहन अंगावरून चढवत फरपट नेल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे देखील पाहा -

अपघातानंतर पिकप वाहन चालक देविदास रतन पाटील राहणार बांबुर्ली खंडाला जिल्हा धुळे याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करून वाहन थांबविले. असता चालकाने उतरून ऊसाच्या शेतामधून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. खाली कोसळलेल्या सुदाम गावित यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, असून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांना मृतदेह ताब्यात दिल्यावर बर्डीपाडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे.

घटनास्थळी विसरवाडी पोलीस जमादार दिलीप गावित, कॉन्स्टेबल दारासिंग पावरा यांनी दाखल होत, पंचनामा केला असून मयताचा मुलगा रसिक सुदाम गावित यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप गावित हे करत आहे. पिकअप वाहन चालकाच्या चुकीमुळे घरातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने मयताच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार करणार ३ जिल्ह्यांचा दुष्काळ दौरा

Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई! कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

Ratnagiri Water Stock : रत्नागिरीकरांनो, पाण्याची चिंता मिटली! पुढील ५ महिने टेन्शन नाही, धरणांमध्ये किती साठा?

ICICI बँकेची दिवाळीपूर्वी मोठी घोषणा! FD च्या व्याजदरात वाढ, कोणत्या मुदत ठेवीवर किती व्याज मिळणार? वाचा

Real vs Fake Honey: तुम्ही खात असलेलं मध शुद्ध आहे की भेसळयुक्त? घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट

SCROLL FOR NEXT