Police detain farmer who attempted to burn BJP MLA Sanjay Kute's residence over flood compensation delay. Saam
महाराष्ट्र

BJP Leader: पेट्रोलचा कॅन घेऊन आत घुसला, घरात कुणी न पाहताच..भाजप आमदाराचा बंगला पेटवण्याचा प्रयत्न; नेमकं प्रकरण काय?

BJP Leader Residence: जळगाव-जामोदमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला.

Bhagyashree Kamble

राज्यात मे महिन्यातच अवकाळी पावसाला सुरूवात झाली. पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं. यामुळे शेतीसोबत फळबागा उद्ध्वस्त झाल्या. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरीवर्ग नाराज झाला आहे. शेतकरीवर्ग सातत्याने मदतीसाठी लोकप्रतिनिधींना भेट देत आहेत. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे शुक्रवारी मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला. संतप्त झालेल्या शेतकऱ्याने भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांचे निवास्थान पेटवण्याचा प्रयत्न केला.

थेट आमदारांचा बंगला जाळण्याचा प्रयत्न

संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड याने आमदार संजय कुटे यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी प्रवेश मिळवला. त्याच्या हातात पेट्रोलचं कॅन होतं. 'माझ्या शेतीचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असून अद्याप मोबदला मिळालेला नाही, त्यामुळे मी आमदारांचा बंगला जाळून टाकणार', असं म्हणत शेतकरी बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या दिशेनं गेला.

या घटनेवेळी आमदार संजय कुटे निवासस्थानी उपस्थित होते. शेतकरी पेट्रोलचं कॅन घेऊन येत असल्याचं पाहताच स्वीय सहाय्यकाने त्याला अडवलं. चौकशी करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत शेतकऱ्यावर BNS कलम 333 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डॉ. संजय कुटे कोण आहेत?

डॉ. संजय कुटे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जळगाव-जामोदचे आमदार आहेत. २००४ साली ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले होते. मागील २० वर्षांपासून जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Police Bulldozer Action:नाशिकमध्ये 'उत्तर प्रदेश' पॅटर्न, बड्या राजकीय नेत्याचं साम्राज्य जमीनदोस्त; कारण काय?

Talathi Bharti: तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य, अनुभवानुसार काही जागा राखीव; राज्य सरकारचा निर्णय

किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

रस्त्यावरची दहशत कमी करण्यासाठी पुण्यात भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्याचा नवा मार्ग

Diwali Pahat: दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहायचाय? तर मुंबईतील 'या' ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT