राज्याच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तापलाय. स्वाभामानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तुमची औकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं, तर आश्वासन का दिलं? असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला केलाय. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून कर्जमाफीचं अश्वासन देण्यात आलं होतं. महायुतीने दिलेल्या आश्वसनावर घुमजाव केलाय. त्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर संताप व्यक्त करत हल्लाबोल केलाय.
शेतकरी कर्जमाफीवरून (Loan Waiver) प्रहार संघटनेनेकडून सरकारमधील नेत्यांना जाब विचारला जात आहे. त्याचप्रमाणे स्वाभिमानी संघटनेचे नेते महायुतीच्या मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्रमात जाऊन कर्जमाफीचा जाब विचारणार, असा इशारा राजू शेट्टी यांना दिलाय. निवडणुकीच्या काळात महायुतीने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. हमीभावाच्या २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती, पण दोन्ही घोषणा हवेत विरल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत, असं राजू शेट्टी म्हणालेत.
अजित पवार म्हणतात, आम्ही आता सातबारा कोरा करू शकत नाही, राज्याची तशी स्थिती नाहीये. मग महायुतीने खोटं अश्वासन का दिलं? शेतकऱ्यांना का गंडवलं? राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे तर, शक्तिपीठ सारखे खर्चिक प्रकल्प का लादले जात आहेत? त्यामुळे यापुढे महायुतीच्या नेत्यांना राज्यात फिरणं मुश्किल करू, असं राजू शेट्टी यांनी म्हणालेत. तुमची औकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं, तर आश्वासन का दिलं? असा सवालही राजू शेट्टी यांनी यावेळी केला.
राज्यात आता महायुतीचं सरकार (Mahayuti Government) आलंय, मात्र कर्जमाफीबाबत अजूनही कोणतीच हालचाल होताना दिसत नाहीये. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून कर्जमाफीवरून वेगवेगळी विधानं केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. सरकार कर्जमाफी करत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेत मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहे. आता स्वाभिमानी संघटना सुद्धा मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्रमात जाऊन जाब विचारणार आहे. त्यामुळे सरकार कोंडीत अडकणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याचं आणि कर्जमाफीचं आश्वसने दिली होती. परंतु अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढला नाही. ना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाहीये. त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान केलं होतं. शेतकरी कर्ज घेतात.
त्यानंतर पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात. एकदा की कर्जमाफी झाली त्यातून मिळणारे पैशांनी लग्न, साखरपुड्याचे कार्यक्रम करतात, असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोकाटे यांना समज दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.