Bhandara Farmer Success Story Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Farmer Success Story: कारले,स्वीटकॉर्न,लाल टोमॅटोच्या शेतीतून ३ भावंडे लखपती; सुशिक्षित तरुणांच्या यशाचं गुपित काय?

Vishal Gangurde

शुभम देशमुख

Farmer Inspiring & Success Story in Marathi

शेतीकडे पाठ फिरवून नोकरीच्या मागे फिरणारा तरूण आपण सध्या पाहतो. परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात अगदी मास्तरकी आणि इंजिनिअरची पदवी असलेल्या तरूणांना तुटपुंज्या पगारावर नोकरी करायला लागत आहे. मात्र, आधुनिक पद्धतीने शेती केली तर थोड्या शेतीतून सुद्धा लाखोचे उत्पन्न घेऊ शकतो. हे भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील डीएड,बीएड झालेल्या स्वप्निल नंदनवार या तरूणाने सिद्ध करून दाखवून दिले आहे. (Latest Marathi News)

प्रगतीशील शेतकरी स्वप्निल हा बीएड,डीएड, आशिष एम.ए.,बीएड तर अंकुश मेकॅनिकल इंजिनिअर आहे. या तिघांनी नोकरीसाठी धडपड केली पण योग्य नोकरी मिळू शकली नाही. त्यामुळे तिन्ही भावंडांनी आपल्या शेतीतून समृद्धी आणण्याचे ठरविले. त्यानुसार स्वप्निलच्या पुढाकारातून भाजीपाल्याची शेती सुरू झाली. पुढे आशिषने देखील स्वप्निलची मदत सुरू केली.

सुरूवातीला केवळ दीड एकर जागेवर विविध पिकांची लागवड केली. यापैकी काकडीच्या पिकाने बऱ्यापैकी कमाई करून दिली. त्यामुळे दोघांनी भाजीपाल्याची शेती अधिक तंत्रशुद्ध पद्धतीने करण्याचे ठरविले. त्यानंतर शेतीतून नफा कमावत गेले. त्यानंतर चार एकर शेतीत कारले,स्वीटकॉर्न,लाल टोमॅटोची शेती करीत वावर आहे तर पॉवर आहे हे दाखवून दिले आहे.

दरम्यानच्या काळात अंकुश नागपुरात मेकॅनिकल इंजिनिअर करत होता. त्याच्या मदतीने रिलायन्स फ्रेशशी संपर्क करून त्यांनाही भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात आला. आता हे तिघे भाऊ सामूहिकरीत्या आपल्या शेतात मेहनत घेतात.

पारंपरिक पद्धतीला फाटा देत त्यांनी नव्या दमाने आणि जोमाने शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे आशिषला मार्केटिंगचे कौशल्य असल्याने तो आपला भाजीपाला कुठे आणि कसा विकायचा याचे नियोजन करतो, तर स्वप्नील आणि अंकुश शेतातील सर्व कामाचे नियोजन करतात.

अर्थात या व्यवसायाशी संबंधित सर्व छोटे मोठे निर्णय तिघेही मिळून घेतात. त्यामुळे अवघ्या तीन वर्षाच्या काळात या भंडाऱ्यातील तीन नंदनवार भावंडांनी शेतीतून देखील एक चांगला स्टार्टअप होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

SCROLL FOR NEXT