Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Devendra Fadnavis on Uddhav Thackeraysaam tv

Chandrashekhar Bawankule:'देवेंद्र फडणवीस तुमच्यासारखं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जपानला गेले नव्हते'; भाजपकडून ठाकरेंना प्रत्युत्तर

chandrashekhar Bawankule: देवेंद्र फडणवीस तुमच्यासारखं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जपानला गेले नव्हते, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
Published on

सूरज मसुरकर

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray:

हिंगोलीत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या जपान दौऱ्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'देवेंद्र फडणवीस तुमच्यासारखं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जपानला गेले नव्हते, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,' उद्धव ठाकरे सत्तेत असताना अडीच वर्षे घरात बसून होते, ज्यांनी करोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं, गेल्या महिन्यात जे १५ दिवस परदेश दौऱ्यावर जाऊन सुट्टी एन्जॉय करून आले, ते देवेंद्रजी यांच्या जपान दौऱ्यावर टीका करत आहेत'.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Santosh Bangar on Uddhav thackeray: 'उद्धव ठाकरेंच्या सभेत अनेक खुर्च्या रिकाम्या, लोक बाहेर जिल्ह्यातील; संतोष बांगर यांचं प्रत्युत्तर

'देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा तुमच्यासारखा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी नव्हता तर राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी होता, असं बावनकुळे म्हणाले.

'उद्धव ठाकरे एक लक्षात घ्या, तुम्ही आता विवेकभ्रष्ट, नितीभ्रष्ट झाला आहात. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुम्हाला सडकछाप शब्दांचा वापर करावा लागत आहे. तुमचे हे नैतिक अधःपतन महाराष्ट्र बघत आहे, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Hingoli Sabha: 'पंतप्रधानांना राखी बांधली आणि कारवाई थांबली', उद्धव ठाकरेंची भावना गवळींवर टीका

'PM मोदी यांच्या कर्तृत्वामुळे तुमच्या घमेंडियाला घरघर लागली आहे. त्यामुळे तुम्ही हर घर मोदी अभियानावर टीका करत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. पीएम मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या जनतेच्या प्रेमामुळेच तुमच्या अहंकाराचा येत्या निवडणुकीत पराभव होईल, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com