Ratnagiri News  Saam TV
महाराष्ट्र

Ratnagiri News : झाडांना वाचवताना वणव्यात होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू, दापोलीतील दुर्दैवी घटना

सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या परिसरात हा वणवा लागला होता.

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्नागिरी : रत्नागिरीतून एक दु:खद घटना समोर आली आहे. दापोली तालुक्यातील लाडघर येथे झगडेवाडी ते दवंडेवाडी परिसरात लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या परिसरात हा वणवा लागला होता.

अनिल झगडे असं होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे. अनिल झगडे हे बागेत काम करत असताना वनव्याची आग भडकत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. मात्र आगीमुळे आपल्या आपल्या आवारातील झाडांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलं.  (Latest News Update)

वनसंपदा वाचवण्यासाठी ते वणवा विझवण्यासाठी म्हणून धावपळ करू लागले. मात्र या वणव्याच्या आगीच्या भक्षस्थानी अनिल झगडे पडले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोकणातील वनव्यांची समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावरून आता तरी हालचाली होतील का? असा प्रश्न देखील कोकणातील शेतकरी आता उपस्थित करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalya Miriche Fayade: काळी मिरीची चिमूटभर पूड 'या' ६ पदार्थांसोबत खा, चमत्कार पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, साखरेच्या किमती लवकरच कमी होणार

अग्निवीर सैनिकांनीसाठी 4 वर्ष पूर्ण होण्याच आत मिळणार नोकरी; कुठे मिळणार संधी?

West Bengal Politics: ममता बॅनर्जींना २४ तासांत दुसरा धक्का! उमेदवारानं ऐनवेळी निवडणुकीतून घेतली माघार

Weekly Horoscope: पुढचा आठवडा ५ राशींसाठी ठरणार गेमचेंजर, तर काहींवर येणार मोठं संकट; वाचा तुमचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT