Uddhav Thackeray News: ठाकरेंना मोठा दिलासा, संपत्ती चौकशीसंदर्भातील गौरी भिडेंची याचिका HC ने फेटाळली, २५ हजार दंड

गौरी भिडे यांना कोर्टाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysaam tv
Published On

सचिन गाड

Uddhav Thackeray News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी दाखल याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना कोर्टाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करावी यासाठी गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. भिडे यांची ही याची उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप गौरी भिडे यांनी करत ही याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल केली परंतु त्यामध्ये काही पुरावे नसल्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली आहे. (Latest News Update)

Uddhav Thackeray
ALERT! H3N2 Virus ने टेन्शन वाढवलं; पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळले ३३ रुग्ण

गौरी भिडे यांनी प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय? याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. कोरोना काळात इतर वृत्तपत्रांना तोटा सहन करावा लागत असताना सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता. तर साडे अकरा कोटी रुपये नफा होता, हे कसं शक्य झालं? अशी मागणी गौरी भिडे हायकोर्टात केली आहे.

Uddhav Thackeray
TTE urinates on woman: टीसीचं ट्रनेमध्ये घाणेरडं कृत्य; प्रवासी महिलेवर केली लघवी

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रानुसार, उद्धव ठाकरेंची एकूण संपत्ती जवळपास 125 कोटींची संपत्ती आहे. तसेच्या त्यांच्यावर एकूण बँकेचं कर्ज 4 कोटी रुपये आहे. आदित्य ठाकरेंकडेही जवळपास 15 कोटींची संपत्ती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com