Chhatrapati Sambhajinagar Saam Tv
महाराष्ट्र

डोक्यावर कर्जाचं ओझं; पत्नीनं विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं, अंत्यसंस्कार उरकून पतीनंही विहिरीजवळ गळफास घेतला

Farmer Couple Ends Life: आळंद गावातील विवाहित जोडप्याने कर्जबाजारीपणामुळे आयुष्य संपवलं. या दुर्देवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Bhagyashree Kamble

  • शेतकरी जोडप्यानं कर्जबाजारीपणामुळे आयुष्य संपवलं

  • प्रथम पत्नीनं आयुष्य संपवलं.

  • नंतर पतीनं गळफास लावून आत्महत्या केली.

छत्रपती संभाजीनगरच्या आळंद येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. विवाहितेनं आधी विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. नंतर पतीनंही विहिरीपासून काही अंतरावर गळफास घेऊन आयुष्य संपवलं. कर्जबाजारीपणामुळे जोडप्यानं टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे. त्यांनी यासंदर्भातील मेसेज व्हॉट्सअॅपवर शेअर केला होता. दोघांच्या दुर्देवी मृ्त्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

विलास रामभाऊ जमधडे (वय वर्ष ४३) असे मृत पतीचे नाव आहे. तर, रमाबाई असे मृत महिलेचं नाव आहे. विलास हे शुक्रवारी गावी गेले होते. त्याच दिवशी रमाबाईंनी विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं. विलास यांना प्रचंड धक्का बसला. रमाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक घरी पोहोचले होते. पत्नीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक घरी गेले.

विलास त्यानंतर शेतात गेले. त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर कर्जबाजारीपणामुळे आयुष्य संपवत असल्याचा मेसेज टाकला. नंतर रमाबाईंनी आत्महत्या केलेल्या विहिरीजवळ त्यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विलास यांच्या पश्चात विवाहित मुलगी आणि दोन अविवाहित मुले आहेत.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास जमधडे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावावर अवघी ४३ गुंठे जमीन होती. शेतातून पुरेसा उत्पन्न न मिळाल्यानं ते पत्नीसोबत मजूरी करत होते. यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. मात्र, विलास यांच्यावर बँक, सोसायटी, खासगी सावकरांचे मोठे कर्ज होते. रमाबाई यांच्यावरही बचत गटाचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, पुण्यातील मराठा सेवकांची मागणी

Rupali Thombare Photos: फ्रायरब्रँड नेत्या, रुपाली पाटील ठोंबरेंविषयी 'या' 6 गोष्टी माहित आहेत का?

फलटण डॉक्टर प्रकरणी काँग्रेस आक्रमक; वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा|VIDEO

Politics: धुळ्यात मोठी राजकीय घडामोड, भाजपला एकनाथ शिंदेंकडून जोरदार दणका; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'धनुष्यबाण'

Should eggs be washed before eating: अंडी खाण्यापूर्वी का धुतली पाहिजेत? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT