अभिजीत सोनावणे, साम टीव्ही
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील वणी रोडवर मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. अल्टो कार आणि मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाल्याने कार रस्त्याशेजारील नाल्यात उलटली. कार नाल्यात उलटल्यानंतर प्रवाशांच्या नाका तोंडात पाणी गेलं. यामुळे सर्वजण गुदमरले. यातच ७ जणांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की कार आणि दुचाकी दोघांचाही चक्काचूर झाला. तसेच मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जण नातेवाईकांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून परत येत असताना हा अपघात घडला.
नाशिकमध्ये भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू
नाशिकच्या कळवण रस्त्यावरील शिवनेरी हॉटेल - संस्कृती लॉन्ससमोर रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. अल्टो कार आणि मोटारसायकल यांची एकमेकांना जोरदार धडक बसली. खड्डा चुकवताना कार नाल्यात उलटली. कार पाण्यात पडल्यानं प्रवाशांना त्वरीत कारमधून उतरता नाही आले.
यामुळे कारमध्ये पाणी शिरलं आणि प्रवाशांच्या नाका तोंडात पाणी गेलं. गुदमरून ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, मृत तीन कुटुंब कोशिंबे देवठाण आणि सारसाळे येथील रहिवासी आहेत. अपघातातील मयत हे नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेले होते. गावी परताना कार आणि दुचाकी अपघात घडला.
मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. या घटनेनंतर तिन्ही कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर दुचाकीतील प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील मृतांची नावे
1) देविदास पंडित गांगुर्डे (वय -28 रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक) 2) मनीषा देविदास गांगुर्डे, (वय -23 वर्षे, रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा. नाशिक) 3)उत्तम एकनाथ जाधव, (वय – 42 वर्षे रा- कोशिंबे, ता दिंडोरी, जिल्हा – नाशिक) 4) अल्का उत्तम जाधव, (वय – 38 वर्षे रा. कोशिंबे ता. दिंडोरी जिल्हा. नाशिक) 5)दत्तात्रेय नामदेव वाघमारे, (वय – 45 वर्षे रा. देवपूर, देवठाण ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक) 6)अनुसया दत्तात्रय वाघमारे, (वय – 40 वर्षे रा देवपूर, देवठाण ता – दिंडोरी, जिल्हा – नाशिक) 7)भावेश देविदास गांगुर्डे, (वय – 02 रा. सारसाळे, ता दिंडोरी, जिल्हा- नाशिक)
जखमींची नावे
1) मंगेश यशवंत कुरघडे, (वय-25) 2) अजय जगन्नाथ गोंद (वय -18 वर्षे) रा. नडगे गोट, ता. जव्हार, जि. पालघर सध्या राहणार भोला पिंपळगाव, सातपूर हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.