समृद्धि महामार्गावर काम करण्याऱ्या मृत मजूरांचे कुटुंब मदतीच्या प्रतिक्षेत... संजय जाधव
महाराष्ट्र

समृद्धि महामार्गावर काम करण्याऱ्या मृत मजूरांचे कुटुंब मदतीच्या प्रतिक्षेत...

कामावर बालमजूर सुद्धा काम करीत आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा - नागपुर - मुंबई Mumbai ह्या समृद्धि महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामासाठी विविध कंपन्या काम करीत आहेत. हा महामार्ग बुलढाणा Buldhana जिल्ह्यातून जात असून रस्त्याच्या कामावर मध्यप्रदेश Madhya Pradesh व बिहार Bihar येथून कामगार मजूर आणले गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी याच कामावरिल मजूर महामार्गावर एका टिप्परमध्ये काम करण्यासाठी जात होते त्या टिप्परमध्ये लोखंडी रॉड होते. त्यावर बसून हे मजूर जात असताना एका एसटीला साइड देताना टिप्पर रस्त्याच्या एका साइडने खाली उतरले असता पलटी झाले. टिप्परमधील लोखंडी रॉड खाली सर्व मजूर दबले गेले त्यात १३ मजुरांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

हे देखील पहा -

हा अपघात महाराष्ट्र राज्यात झाला असून राज्य सरकारने अद्याप पर्यंत कुठलीही आर्थिक मदत या मृत कुटुंबाला केली नाही. तसेच ज्या कंपनीच्या अंतर्गत हे मजूर काम करीत होते त्या कंपनीने एक टक्का ही दाखल घेतली नाही त्या मजुरांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पोहचवण्यासाठी अँब्युलन्स सुद्धा तात्काळ उपलब्ध करुण दिली नाही.

या मजूरांना टिनपत्र्याचे 6 बाय 6च्या रूम बांधून दिल्या आहेत. या मजूरांकडून 24 तास काम करुण घेतल्या जाते. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व जेवण्याची अजिबात व्यवस्था नसल्याने मजूरा कडून अर्धपोटी अवस्थेत काम करुण घेतले जाते. या ठिकाणी 5 ते 6 हजार कामगार मजूर कार्यरत असून एकाही मजूरांचा विमा सुद्धा काढला गेला नाही. मजूर ज्या ठीकानी राहतात तेथील व्यवस्था अत्यंत वाईट असल्याचे दिसून येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Breaking News : जालन्यात मुसळधार पावसाचा कहर, पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Live News Update: पुण्यात नसरापूरमध्ये महिलेला हिप्नॉटाइज करत भरदिवसा सोन्याची लूट

Raigad : रायगडमध्ये पावसाचा 'हाहाकार'! महाडमध्ये पूरस्थिती, शाळा-कॉलेज बंद | VIDEO

Mumbai 26th July : मुंबईकरांनो सावधान! पुन्हा २६ जुलैचा धोका, समुद्रकिनारी जाणं टाळा, IMD कडून मुसळधारेचा इशारा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पैशांवर लाडक्या भावांचा डल्ला, तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतला महिन्याला १५०० रुपयांचा लाभ

SCROLL FOR NEXT