Excise officials inspect a truck loaded with suspected counterfeit whisky during a major crackdown on an illegal liquor racket. saam tv
महाराष्ट्र

तुम्ही पिताय नकली व्हिस्की? बनावट व्हिस्कीचा ट्रक जप्त, उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

Duplicate Whisky : तुम्ही विस्की पीत असाल तर तुमच्या ही बातमी महत्त्वाची आहे. कारण राज्यात आता नकली व्हिस्कीचे रॅकेट समोर आलंय. बोगस व्हिस्कीचा मोठा साधा जप्त करण्यात आलाय. नेमकी कुठे विकली जाते ही बोगस व्हिस्की? कसा पकडला हा साठा? पाहूया यावरचा हा रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • उत्पादन शुल्क विभागाने बोगस व्हिस्कीने भरलेला ट्रक जप्त केला.

  • या कारवाईमुळे अवैध मद्य पुरवठा साखळीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • बनावट मद्याचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा

रोहित कदम, साम प्रतिनिधी

तुम्हीसुध्दा व्हिस्कीचे शौकीन आहात का?. कारण तुम्ही पित असलेली व्हिस्की बनावट असू शकते. कारण सध्या राज्यात वनावट व्हिस्कीचे ट्रकच्या ट्रक नेत असल्याचं उघड झालंय. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये समोर आलाय.

गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने साळमुख चौकात सापळा रचला होता. यावेळी सांगोला मार्गे धुळेकडे जाणारा एक संशयित ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रकसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही दारू नेमकी कुठून आणण्यात आली होती आणि ती कुठे पोहोचवली जाणार होती, याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येतोय. खरंतर, गेल्याच महिन्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारु प्रकरणामुळे 18 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे बनावट दारूविरोधात राज्यभर धडक मोहिमा राबवत कठोर कारवाईची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दिपकेंच्या भेटीवरून महायुतीत वाद; भाजपकडून संजय शिरसाठ-कडूंवर कारवाईची मागणी

'तुम्ही कधीपर्यंत गुंगी गुडिया बनून राहणार?' काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डिवचलं

Pradeep Rawat Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर बंदी,काय आहे कारण?

Wednesday Horoscope: कामात संधी, आनंदाची बातमी; या 5 राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा बुधवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT