Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: 'तुझ्यावर पैशांचा पाऊस पडेल, फक्त तू..', व्यवसायात नुकसान, ३ भोंदूबाबांनी मालकाला हॉटेलमध्ये नेलं अन्..

Fake tantrik arrested: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून एका नामांकित हॉटेलमध्ये अघोरी पूजा करणाऱ्या तिघा भोंदूबाबांना पोलिसांनी अटक केली आहे.

Bhagyashree Kamble

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका नामांकित हॉटेलमध्ये अघोरी पूजा करणाऱ्या तिघा भोंदूबाबांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. आरोपींनी एका आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यक्तीकडून लाखो रुपये उकळून, त्याच्या हॉटेल रूममध्ये पूजा करून नोटा उधळण्याचा प्रयोग केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित पीडित व्यक्तीला लॉकडाऊनदरम्यान आपल्या व्यवसायात मोठा फटका सहन करावा लागला होता. आर्थिक चणचण होती. कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने आणि बँकेच्या नोटिसा येऊ लागल्याने तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपींनी पीडित व्यक्तीला आपल्या भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.

ग्रामीण भागातील दोन भोंदूबाबांनी त्याला पैशांचा पाऊस पाडण्याची भूलथाप दिली. पैसे दुप्पट, तिप्पट होणार असल्याचा विश्वास बसवून त्यांनी त्या व्यक्तीकडून मोठी रक्कम उकळली होती. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून जालना रोडवरील हॉटेलमध्ये जादूटोण्याचा हा प्रकार सुरू होता.

याची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर धाड मारून जादूटोण्याच्या साहित्यासह तिघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून विविध प्रकारच्या बनावट नोटा, प्लास्टिकच्या पुडीतील काळसर पावडर, चार रंगांच्या कवड्या, मंत्र लिहिलेले कागद, दोन वाळलेली लिंबू, दोन नारळ, लाल रंगाचा कपडा, जडीबुटी आणि इतर जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

विकास कामावरून वडडी ग्रामपंचायतीत वाद

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वडडी गावात ग्रामपंचायतीच्या विकास कामावरून वाद उफाळून आला असून, या वादातून ग्रामपंचायत सदस्याच्या भावासह दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

ही मारहाण वडडी ग्रामपंचायतीच्या सभेदरम्यान ग्रामविकासाच्या प्रश्नांवर उघडपणे आवाज उठवल्याच्या रागातून झाल्याचा आरोप जखमी व्यक्तींनी केला आहे. या प्रकरणात सरपंच गटातील कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या मारहाणीबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात ५ ते ६ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT