Air India Plane: १५६ प्रवासी घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाचं एमर्जन्सी लँन्डींग; बॉम्ब धमकीमुळे खळबळ

Flight Emergency Landing: अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटानंतर एअर इंडियाच्या एका विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.
Air India
Air IndiaSaam
Published On

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. थायलंडमधील फुकेट येथून नवी दिल्लीकडे येणाऱ्या AI-379 या विमानाला शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे विमान सुरक्षितपणे फुकेट विमानतळावर उतरवण्यात आलं असून, विमानातील १५६ प्रवासी आणि सर्व क्रू सदस्य सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, थायलंडमधील फुकेट येथे एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालिन लँडिंग करण्यात आलं आहे. हे विमान फुकेटहून नवी दिल्लीला येत होते. परंतु, बॉम्बच्या धमकीनंतर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

Air India
Ahmedabad plane crash: अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला, २६५ जणांच्या मृत्यूचं खरं कारण मिळणार

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे विमान एआय ३७९ हे फुकेटहून नवी दिल्लीला निघाले होते. त्यात १५६ प्रवासी होते. परंतु, उड्डाणानंतर बॉम्बची धमकी देण्यात आली. त्यानंतर, विमान अंदमान समुद्राभोवती प्रदक्षिणा घालून परत आले. तसेच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. एओटीने अद्याप बॉम्बच्या धमकीची पुष्टी केलेली नाही.

फुकेट विमानतळावरील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपत्कालीन लँडिंगनंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात येत आहे. सर्वजण सध्या सुरक्षित आहे.

Air India
Ahmedabad Plane crash: मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन अन् बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल, रूग्णालयातही देणार भेट

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले

गुरूवारी अहमदाबादमध्ये २४२ जणांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. या अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि इतर २४१ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे. तसेच यासंदर्भात बैठक घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com