Gold, Yavatmal , Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : सेल्समन म्हणून आले अन् व्यापा-याच्या पत्नीचं साेनं पळवलं

ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Yavatmal : सोने (gold) चकाकून देण्याचे आमिष दाखवून सात तोळे सोने लंपास केल्याची घटना यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यात घडल्याचे समाेर आले आहे. ही घटना वणी शहरात घडली आहे. दरम्यान दागिने साफ करणारे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. (yavatmal latest marathi news)

यवतमाळच्या वणी शहरात सोन्याच्या दागिन्याला साफ करण्याचा बनाव करत दागिने लंपास करणारी टोळी सक्रिय झाली आहे. शहरातील नटराज चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या व्यापाऱ्याच्या पत्नीला सोने चमकावून देतो असे म्हणत सात तोळ्यांच्या चार बांगड्या लंपास केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सध्या शहर व परिसरात भुरट्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. फसवणूक करणारे नवनवीन युक्त्या अवलंबत गृहिणींना टार्गेट करत आहे. वणीच्या नटराज चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या एका व्यापाऱ्यांच्या घरी दोन भामटे सेल्समनच्या वेशात पोहचले. त्यावेळी व्यापाऱ्याची पत्नी व आई ह्या दोघीच घरी होत्या.

भामट्यांनी फरशी पुसण्याचे पावडर विक्री करीत असल्याची बतावणी केली. फरशी साफ करण्यासोबतच दागिनेही चमकावून देतो असे सांगितल्याने व्यापाऱ्याच्या पत्नीचा विश्वास बसला. तिने जुन्या असलेल्या चार सोन्याच्या बांगड्या त्या भमट्याला दिल्या.

त्यानंतर चोरट्याने एका डब्यात त्या बांगड्या टाकून गॅस शेगडीवर ठेवण्यास सांगितले. गृहिणीने डब्बा उघडून बघितलं असता त्या डब्ब्यातील बांगड्या गायब झाल्याचे लक्षात आले. परंतु तोपर्यंत दोन्ही भामटे पसार होण्यात यशस्वी झाले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एक मंडळ एक ढोल पथक करा, गणेश मंडळांची पोलिसांना विनंती

Dadar Kabutar Khana: दादरमध्ये कबुतर खाना कुठे आहे?

Nashik Crime : दारु पिण्यास मागितले पैसे; कुटुंबीयांनी नकार दिल्याने राग अनावर, पेट्रोल टाकून राहते घरच पेटविले

Pune Accident: रक्षाबंधनाआधीच बहीण-भावाची ताटातूट, अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू, बहिणीची मृत्यूशी झुंज

Mrunal Thakur: कुमकुम भाग्य नव्हे तर ही होती मृणाल ठाकूरची पहिली मालिका

SCROLL FOR NEXT