Ladki Bahin Yojana news  Saam tv
महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेसंदर्भात 'या' लिंकपासून सावध राहा; होऊ शकतो स्कॅम

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात बनावट साईट्स आणि फेक लिंक व्हायरल होत आहेत, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bhagyashree Kamble

  • लाडकी बहीण योजनेसंदर्भात बनावट वेबसाइट व फेक लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल.

  • आधार कार्ड नंबर गोळा करून डेटा चोरीचा धोका निर्माण.

  • योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर अपात्र लाभार्थ्यांची यादी उपलब्ध नाही.

राज्य सरकारची सुपरहिट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. या योजनेच्या नावानं काही बनावट वेबसाईट्स आणि फेक लिंक्स सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या लिंक्सवर क्लिक करून आधार क्रमांक मागवला जात असून, त्यामुळे डेटा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचे पैसे जमा झाले नाही. त्यामुळे काही जण चुकीच्या फेक लिंक्सला बळी पडतात.

आपण पात्र आहोत की नाही, हे तपासण्यासाठी काही लिंक्स शेअर होत आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थींनी अशा अफवांपासून सावध राहावं आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर निर्णय घेऊ नये.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रूपये जमा होतात. या योजनेच्या निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मात्र, तपास केल्यानंतर पुरुष आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनीही या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे सरकारने योजनेची छाननी करत २६.३४ लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळेच जून महिन्यात त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली नाही.

अपात्र लाभार्थी महिलांची यादी तपासता येत नाही

काही महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिला फेक लिंक्सला बळी पडतात. पण वेबसाईटवर अपात्र महिलांची यादी तपासण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. पात्र महिलांच्या संबंधित वैयक्तिक माहिती आपल्याला मिळेल. पण पात्र नाही. तसेच कोणत्या महिन्याचा हप्ता खात्यावर जमा झाला, हे देखील पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT