Nashik: आर्मी ड्रेस घालून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांकडून अटक अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Nashik: आर्मी ड्रेस घालून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांकडून अटक

लष्करी अधिकारी आहे म्हणून सदर इसम या भागात फिरत होता

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यामधील देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरी (School) परिसरामध्ये लष्करी अधिकारी असल्याचे सांगून फिरणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक (arrested) केली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून हा तोतया व्यक्ती अतिसंवेदनशील लष्करी परिसरामध्ये फिरत असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित तोतया अधिकाऱ्याकडे लष्कराच्या कँटीनचे कार्ड तसेच त्याच्या गाडीवर लष्कराचा लोगो देखील आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (police) आरोपीला अटक (Arrested) केली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गणेश पवार असे अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. तो चांदवड (Chandwad) तालुक्यातील हरसूल (Harsul) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

हे देखील पहा-

शिवाय तो काही दिवस नांदुकरनाका (Nandukarnaka) येथे वास्तव्याला असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. ही माहिती मिळताच दोन्ही ठिकाणी पोलीस पथक रवाना झाले आहे. आर्मी इंटेलिजन्स ब्युरोच्या पथकाने या इसमाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा कसून तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश पवार हा मंगळवारी रात्री लष्करी अधिकारी असल्याचे सांगून देवळाली कॅम्प परिसरात स्कूल ऑफ आर्टिलरी परिसरात फिरत होता.

यावेळी येथील काही अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी गणेश पवार याला अडवून चौकशी केली. चौकशी करत असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामधून त्याचे बिंग फुटताच अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे. यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना दिली. आरोपीकडे संरक्षण खात्याचे कँटीन कार्ड तसेच लष्कराचा गणवेश आढळला आहे.

याचबरोबर त्याच्या गाडीवर देखील लष्कराचा लोगो आढळला आहे. असे करण्यामागे आरोपीचा नेमका उद्देश काय होता? याची कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाही. आरोपीचा कसून तपास केला जात आहे. लष्करी कॅम्प सारख्या संवेदनशील परिसरात हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT