MNS MLA Raju Patil Criticise BJP saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: फडणवीस, शेलार आमच्या मालकांकडे समर्थनासाठी चपला घासतात, मनसे आमदार राजू पाटील यांची टीका

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजीत देशमुख, साम टीव्ही

MNS MLA Raju Patil Criticise BJP: आम्ही विरोधात गेलो तर महाराष्ट्रात भाजपाची काय परिस्थिती होईल याचं चिंतन ‘त्यांनी’ करावं असा सल्ला वजा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांचा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना दिला आहे. कपिल यांनी विरोधकांचा पक्ष मालकी तत्वावर चालत असल्याची टीका केली होती. त्याला राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अंबरनाथ येथील भाजपच्या सभेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांचे पक्ष मालकी तत्त्वावर असल्याचे टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेसपासून ते मनसेपर्यंत पक्षाचे मालक सांगितले. हे सर्व पक्ष मालकी तत्वावर चालतात. देश किंवा संविधान वाचवण्यासाठी हे पक्ष एकत्र आले नाहीत तर स्वतःचे पक्ष वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. (Marathi Tajya Batmya)

कपिल पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजू पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या पक्षाचे मालक राजसाहेब ठाकरे आहेत, हे सत्यच आहे. परंतु याच आमच्या मालकांकडे समर्थनासाठी फडणवीस, शेलार शिवतीर्थावर आपल्या चपला घासतात याचे भान सन्माननीय मंत्री महोदयांनी ठेवायला हवे, असे राजू पाटील म्हणाले. (Latest Political News)

आम्ही हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आणि विचारांवर या सरकारला बिनशर्त पाठींबा दिला आहे. आमचा मान आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा भान भाजपाने ठेवणं अपेक्षित आहे. आम्ही जर विरोधात गेलो तर महाराष्ट्रात भाजपाची काय परिस्थिती होईल याचं चिंतन ‘त्यांनी’ करावं असा सल्ला वजा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला दिला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT