Fact Check Shirdi Saibaba Sansthan donation money to the mosque video is fake  Saam TV
महाराष्ट्र

Shirdi News: शिर्डीतील साई संस्थानने मस्जिदला पैसे दिले? व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य काय?

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे, साम टीव्ही

Shirdi Sai Baba Temple News: साईबाबा संस्थानला साई भक्तांकडून प्राप्त होणारी दानाची रक्कम मस्जिदला दिली जात असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल माध्यमात व्हायरल होत आहे. त्यामुळे साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण खरंच साईबाबा संस्थान अशा पध्दतीने प्राप्त दान इतर धार्मिक संस्थांना देते का? काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य? जाणून घेऊया थोडक्यात... (Latest Marathi News)

साईबाबांचे देश विदेशातील करोडो भक्त साई समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत (Shirdi News) येत असतात. हे भक्त साई चरणी रोख रकमेसह सोने, चांदीची आभूषणे आणि विविध वस्तू देणगी स्वरूपात देत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानविषयी एक व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

हिंदू भाविकांकडून जमा होणारी दानाची रक्कम साईबाबा संस्थान मस्जिदसाठी देत असल्याचा दावा या व्हिडीओत (Viral Video) करण्यात आला आहे. मात्र, साईबाबा संस्थानने असा कुठलाही निधी दिला नसून, निधी देण्याची तरतूदच नसल्याचं साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी म्हटलं आहे.

संस्थानकडे जमा होणारी दानाची कर्मचाऱ्यांचे पगार, साईभक्तांच्या सुविधा, भोजन व्यवस्था, संस्थान मार्फत चालवली जाणारी दोन रुग्णालये, शैक्षणिक संस्था तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केली जाते. तसेच या निधीचा विनियोग करताना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते असे देखील तांबे यांनी स्पष्ट केलं आहे.

शिर्डी ग्रामस्थही आता अशा अप्रचारामुळे आक्रमक झाले असून साईसंस्थानला आणि पर्यायाने शिर्डीला बदनाम करणयाचं हे कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. व्हायरल व्हिडीओ प्रथमदर्शनी इतर देशातील असल्याचे निदर्शनास येत असून साईबाबा संस्थानच्या नावाने तो व्हायरल करून अपप्रचार करणारांवर कारवाई (Crime News) करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानच्या नावाने वादग्रस्त आणि संभ्रम निर्माण करणारे मॅसेज, व्हिडीओ काही समाज कंटकांकडून सोशल माध्यमांवर पसरवले जात आहेत. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं अवाहन साईबाबा संस्थानसह शिर्डी ग्रामस्थांनी केलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT