Beauty Parlour Kit Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Fact Check: महाराष्ट्र सरकारने सुरू केली 'ब्युटी पार्लर किट सहाय्य योजना', काय आहे सत्य?

Beauty Parlour Kit Yojana: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी 'ब्युटी पार्लर किट सहाय्य योजना' सुरू केली असल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. यामागचे सत्य काय ते घ्या जाणून...

Priya More
  • महाराष्ट्र सरकारची ब्युटी पार्लर किट सहाय्य योजना खरी की खोटी?

  • ब्युटी पार्लर किट योजनेबाबत सरकारने काय स्पष्टीकरण दिले?

  • महिलांना मोफत ब्युटी पार्लर किट मिळणार असल्याचा दावा खरा आहे का?

  • १८ ते ४५ वयोगटातील महिलांसाठी ब्युटी पार्लर योजना आहे का?

  • जिल्हा परिषदेकडून महिलांना ब्युटी पार्लर प्रशिक्षण मिळते का?

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी 'ब्युटी पार्लर किट सहाय्य योजना' सुरू केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांच्या फायद्यासाठी ही योजना आणली असल्याची चर्चा सध्या महिलांमध्ये सुरू आहे. या योजनेद्वारे महिलांना मदत केली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. पण सोशल मीडियावर या योजनेसंदर्भात व्हायरल होणारा हा मेसेज खोटा आहे. महाराष्ट्र सरकारने 'ब्युटी पार्लर किट सहाय्य योजना' अशी कोणतीच योजना सुरू केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या मेजेसकडे महिलांनी दुर्लक्ष करावे असा सल्ला दिला जात आहे.

व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार, 'ब्युटी पार्लर किट सहाय्य योजना' या योजनेअंतर्गत १८ ते ४५ वयोगटातील सर्व पात्र महिलांना मदत मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. ही योजना महिला व बालविकास विभागांतर्गत राबवली जात आहे असे सांगितले जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यभरातील १८ वर्षांच्या तरुणींपासून ते ४५ वर्षांच्या महिलांपर्यंत सर्वांना ब्युटी पार्लर किटचे वाटप केले जाईल असा दावा केला जात आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना प्रचंड आनंद झाला. ते ही पोस्ट आपल्या ओळखीतील इतर जणांना शेअर करत आहेत.

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेच यामागचं सत्य सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या योजनेचा व्हायरल होणारा फोटो शेअर करत हे फेक असल्याचे सांगितले. या पोस्टमध्ये महाराष्ट्र सरकारने लिहिले की, 'महिला व बालविकास विभागांतर्गत 'ब्युटी पार्लर किट सहाय्य योजने'द्वारे १८ ते ४५ वयोगटातील सर्व पात्र महिलांना मदत मिळणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे.'

महाराष्ट्र सरकारने या पोस्टमध्ये असे देखील स्पष्टपणे सांगितले की, ' महाराष्ट्रात अशी कोणतीही राज्यव्यापी योजना नसून, काही जिल्हा परिषदा ग्रामीण मुली व महिलांना अनुदानावर ब्युटी पार्लर व शिवणकामाचे प्रशिक्षण देतात.' त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी अशा कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये आणि त्याकडे दुर्लक्ष करावे असे सल्ला दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील सारसबाग परिसरात एका कारमध्ये मृतदेह आढळला

Aadhaar Card : आधार कार्ड जवळ नसेल तरी चिंता नको! अवघ्या 1 मिनिटात मोबाईलवर करा डाउनलोड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Tyre Nitrogen: कारच्या टायरमध्ये नायट्रोजन भरल्याने खरंच मायलेज वाढतं का?

Shivali Parab: अमेरिकेत पोहोचली शिवाली परब! गुलाबी फ्लोरल ड्रेसमधील सुंदर फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Mumbai Rain : अर्णब चक्रीवादळाचा फटका! मुंबईसह ठाण्यात पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ

SCROLL FOR NEXT