57 लाखांची फ्रेंड रिक्वेस्ट ! SaamTv
महाराष्ट्र

57 लाखांची फ्रेंड रिक्वेस्ट !

तुम्ही जर फेसबुक वरील कुठल्याही अनोळखी व्यक्तीची आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत असाल तर सावधान!

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यात एका व्यक्तीला एका अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे चांगलंच महागात पडलंय. तब्बल सत्तावन लाखांचा गंडा या व्यक्तीला घालण्यात आलाय. आत्माराम रामभाऊ शिंदे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून फेसबुकच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचे अमिष देऊन ५७ लाख रुपयांची त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपण अमेरिकन सैनिक असल्याचे भासवत २५ कोटी रुपयांचे आमिष आत्माराम यांना देण्यात आले. या आमिषाला बळी पडल्यानंतर तब्बल ५७ लाख रुपये या नायजेरियन व्यक्तीच्या खात्यात पाठवल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी अकोला सायबर पोलिसांनी एका नायझेरियन आरोपीला अटक केली असून चौकशी त्याची पोलिस करत आहेत. आत्माराम रामभाऊ शिंदे हे आरोग्य विभागातून विस्तार अधिकारी या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. शिंदे यांचे फेसबुक अकाउंट असून त्यांना एक अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली.

त्यांनी ती रिक्वेस्ट स्वीकारली व दोघांमध्ये फेसबुक वर मैत्री झाली. दरम्यान फसवणूक करणाऱ्याने आपण अमेरिकन सैनिक असून आपली सीरिया येथे नोकरी आहे. माझ्याकडे मोठी रक्कम असून मी ती अमेरिका येथे घेऊन जाऊ शकत नाही. ती, मी तुमच्या खात्यावर पाठवतो. असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला आणि फेसबुकच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचे आमिष देवून तब्बल ५७ लाख रुपयांची फसवणूक केली. अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर सायबर पोलिसांनी एका नायझेरियन आरोपीला आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांनी 13 वर्षीय अभिनेत्रीला केली होती किस, सुपरस्टारबद्दल धक्कादायक दावा

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

धक्कादायक! पोटच्या ३ मुलींचा जीव घेतला, मग आपल्या आयुष्याचाही दोर कापला, आईने का उचललं टोकाचं पाऊल?

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर महिलेसोबत...

SCROLL FOR NEXT