औरंगाबादमध्ये माथेफिरुनं महागड्या गाड्यांच्या फोडल्या काचा... (पहा व्हिडिओ) माधव सावरगावे
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये माथेफिरुनं महागड्या गाड्यांच्या फोडल्या काचा... (पहा व्हिडिओ)

औरंगाबाद शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडल आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : औरंगाबाद Aurangabad शहरात गुन्हेगारांनी criminals अक्षरशः उच्छाद मांडल आहे. कारण गुरुवारच्या मध्यरात्री शहरातील वेदांत तब्बल १९ कारच्या काचा फोडून नासधूस करीत लॅपटॉपसह laptop मौल्यवान वस्तू चोरट्यांनी thieves लुटून नेल्या आहेत. भरदिवसा उद्योजकांवर हल्ला Attack, तरुणाची भर रस्त्यात हत्या, लूट, मंगळसूत्र चोरी अशा एकापाठोपाठ एक घटनांमुळे शहरातील नागरिक हादरले आहेत.

औरंगाबाद शहरातल्या वेदांत नगरातील घरासमोर, पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या १९ महागड्या कारच्या काचा फोडून गुन्हेगारांनी औरंगाबाद शहर पोलिसांना Police एक आव्हानच दिलं आहे. शिवाय एकापाठोपाठ एक घडत असलेल्या, घटनांमुळे औरंगाबाद शहरातील नागरिकही भयभीत झाले आहेत. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वेदांत नगर आहे.

पहा व्हिडिओ-

वेदांत नगरमध्ये घरासमोर उभ्या असलेल्या, महागड्या कारला गुन्हेगारांनी लक्ष्य केले. गुरुवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फुटपाथवरच्या पेवर ब्लॉकने १९ महागड्या कारच्या काचा फोडले आहेत. सीट्स फाडून टाकले आहे. गाड्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. त्यासोबतच प्रत्येक गाडीत काहीतरी होते, त्या सर्व साहित्याची चोरट्यांनी चोरी केली आहे.

शुक्रवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यांनंतर सुरुवातीला वाटले की, कोणीतरी माथेफेरूने रस्त्यावरून जाताना कारच्या काचा फोडल्या असतील. मात्र, कारच्या काचा फोडून, नासधूस करणाऱ्यांनी कारमध्ये लॅपटॉप, हार्ड डिस्क, महत्त्वाची कागदपत्रे, काही वस्तू चोरट्यांनी लुटून नेल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे एकाच वेळेस तब्बल १९ महागड्या कारच्या काचा फोडण्यात आले आहेत.

मात्र, याची साधी कुणकुण कुणाला लागली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जातं आहे. शिवाय १- २ नाही तर तब्बल १९ कार फोडण्याची हिंमत चोरट्यामध्ये आली कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महागड्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. वस्तू चोरट्याने चोरून नेल्याने यामुळे औरंगाबाद पुन्हा हादरून गेले आहे. मागच्या पंधरवड्यात उद्योजकांना मारहाण करण्यात आली होती.

हल्ला झाला, हनुमान नगरात भर रस्त्यात तरुणांची झालेली क्रूर हत्या झाल, भर रस्त्यात मंगळसुत्र हिसकावले गेले. यामुळे औरंगाबाद शहराची गुन्हेगारीकडे वाटचाल सुरू आहे का? असे आता बोले जातं आहे. आता या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. शहरातल्या वर्दळीच्या ठिकाणी एक- दोन नाही तर, तब्बल १९ कार फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल जाते. मग इतकी हिंमत चोरट्यांनीमध्ये कशी आली असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कारण औरंगाबाद शहरात १७ पोलीस ठाणे आहेत. यासाठी १ अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे पोलीस आयुक्त, ३ डीसीपी, ८ एसीपी, जवळपास २७-३२ पीआय, स्पेशल क्राईम ब्रँच, आणि एपीआय ते कॉन्स्टेबलपर्यंत जवळपास ४ हजाराहून अधिक पोलिसांची संख्या आहे. या महिनाभरात औरंगाबाद शहरात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी औरंगाबादकरांनी कधी विचार केला नव्हता. अशा घटनांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराला भयमुक्त ठेवायच असेल तर आता अशा घटनांना रोखले पाहिजे. नाहीतर कधी हल्ला, कधी खून तर कधी लूट अशा घटनांची मालिका वाढत जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT