Nashik ZP News Update saam
महाराष्ट्र

Nashik : नाशिक हादरले! जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह

nashik Ex-ZP Member Kailas Chaudhary Found Dead : नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी यांचा मृतदेह पळसे पंपिंग रोडवरील नाल्यात आढळला, हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Namdeo Kumbhar

Nashik ZP News Update : नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कैलास किसन चौधरी असे त्यांचे नाव आहे. कैलास हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होते. पलशे पंपिंग रोडवरील नाल्यात त्यांचा मृतदेह आढळ्याने खळबळ व्यक्त होतेय. त्यांचा खून झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

मागील आठवडाभरापासून बेपत्ता असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलास किसन चौधरी यांचा मृतदेह पळसे पंपिंग रोडवरील एका नाल्याच्या पुलाखाली गुरुवारी दुपारी आढळून आला. राहत्या घरातून अचानकपणे बेपत्ता असलेले चौधरी यांचा त्यांच्या कुटुंबीयांकडून सर्वत्र शोध घेतला जात होता, मात्र ते सापडले नाही. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती.

दरम्यान, पळसे राजवाडा नाल्यावरील पुलाखाली गुरुवारी दुपारी चौधरी यांचा कुजलेल्या अवस्थेत पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी तत्काळ या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. कैलास यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांकडून याबाबतचा तपास केला जात आहे.

चौधरी यांच्या मृत्यूच्या या घटनेमुळे पळसे परिसरात शोककळा पसरली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, चौधरी यांच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्ट रिपोर्टनंतरच स्पष्ट होणार आहे. चौधरी हे पळसे गटातून २००७ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trekking Tips : ट्रेकिंगला जात असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा

Happy Patel: आमिर खानच्या 'हॅपी पटेल'मधून डीके बोसची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; इमरान खान करणार कमबॅक? पाहा ट्रेलर

Fitness Mistakes: दररोज १०००० पावलं चालताय, पण रिझल्ट झिरो! संशोधनातून ही ५ कारणं आली समोर

Maharashtra Politics: आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा|VIDEO

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उद्या मतदान

SCROLL FOR NEXT