Govind Barge Case Saam
महाराष्ट्र

गोविंद बर्गे प्रकरणात नर्तिकेची मोठी कबुली, पोलिसांसमोर अखेर तोंड उघडलं, नेमकं काय म्हणाली?

Govind Barge Case: गोविंद बर्गे प्रकरणात अटकेत असलेल्या पूजानं पोलिसांसमोर मोठी कबुली दिली आहे. नातेवाईकांना मात्र, वेगळाच संशय.

Bhagyashree Kamble

  • माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

  • नर्तिका पूजा गायकवाडवर ब्लॅकमेलिंगचे आरोप, तिला पोलीस कोठडी सुनावली.

  • पूजाने गोविंदसोबत संबंध असल्याची कबुली दिली.

  • पोलिसांकडून कॉल लॉग आणि आर्थिक व्यवहारांबाबत कसून चौकशी सुरू आहे.

बार्शीत एखाद्या सिनेमासारखी घटना उघडकीस आली आहे. बीडच्या लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवल्याची माहिती आहे. उपसरपंच आणि प्लॉटिंगच्या व्यवसायातून त्यांनी बक्कळ पैसा कमावला होता. त्यांनी तो पैसा एका नर्तिकेवर उधळला. पूजा गायकवाड या नर्तिकेला महागडे भेटवस्तू दिले. नंतर पूजाची डिमांड वाढत गेली. त्यावेळी तिनं घराची मागणी केली. घर नावावर कर नाहीतर, बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी पूजाने दिली, असा आरोप गोविंद यांच्या नातेवाईकांनी केला. याच दबाबामुळे मानसिकरित्या खचून गोविंद यांनी मृत्यूला कवटाळलं, असाही आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पूजाने पोलिसांसमोर मोठी कबूली दिली आहे.

पूजा गायकवाड सध्या पोलीस कोठडीत आहे. बार्शी न्यायालयाने तिला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पण आता तिनं गोविंद बर्गे यांच्याबाबतीत धक्कादायक कबुली दिली आहे. गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध होते, अशी कबुली पूजा गायकवाडने पोलिसांसमोर दिली आहे.

पूजा गायकवाड नेमकी कुठे होती?

गोविंद बर्गे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली, तेव्हा पूजा गायकवाड घटना परिसरात नसल्याचं समोर आलं आहे. पूजा सासुरे गावात नव्हती. त्यावेळी पूजा कला केंद्रात रात्रभर होती. पूजाचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद हे गेवराईहून बार्शीतील वैरागजवळ आले. गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते.

सध्या पोलिसांकडून कॉल लॉग तपासले जाणार आहे. सध्या पोलिसांकडून सगळ्या बाजूनं पोलिसांकडून तपास सुरू आहे.

कोण आहे पूजा गायकवाड?

पूजा गायकवाड (वय वर्ष २१) असे नर्तिकेचं नाव आहे. पूजा ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या सासुरे गावातील रहिवासी आहे. ती बार्शी तालुक्यातील थापडीतांडा या गावातील कलाकेंद्रात जात असल्याची माहिती आहे. याच ठिकाणी गोविंद आणि पूजाची भेट झाली. यानंतर पूजा पारगाव कला केंद्रात गेली.

गोविंद वारंवार पूजाची भेट घेण्यासाठी कला केंद्रात जात असे. मैत्रीचं रूपांतर प्रेमात बदललं. नंतर गोविंद तिला महागडे वस्तू देऊ लागल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: बिग बॉस १९ ने केली टॉप ९ स्पर्धकांची घोषणा; या आठवड्यात कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

Shocking: नर्सिंगच्या विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घेतला गळफास

Rumali Roti : घरच्या घरी बनवा रेस्टॉरेंट सारखी रुमाली रोटी

Ladki Bahin Yojana: निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार! सरकार २ महत्त्वाचे निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT