Anil Deshmukh News Saam TV
महाराष्ट्र

Anil Deshmukh : बापावर हल्ला, मुलगा मैदानात; सलील देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

Anil Deshmukh News Update : अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी दगफेक झाली, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप कऱण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

Ex-Maharashtra minister Anil Deshmukh injured after stone pelting on car : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला झाला. प्रचारसभा आटोपून येत असताना अचानक दगडफेक झाली, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतेय. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नागपूरमधील वातावरण तापलेय. अनिल देशमुख समर्थकांनी याप्रकरणी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असल्यामुळेच असा हल्ला झाला, असा आरोप सलील देशमुख यांनी केला. तर भाजप नेते फुके यांनी अनिल देशमुख यांनी स्वत:वर हल्ला केला, असा गंभीर आरोप केलाय.

अनिल देशमुख यांच्या कपाळाला आणि मानेला दुखापत झाली आहे. सिटीस्कॅन रिपोर्ट आल्यावर सगळं समोर येईल. सहा वाजता प्रचार सभा संपल्यावर ते जलालखेडा येथून येत होते. त्यांच्या गाडीत सोबत उज्वल भोयर आणि डॉ गौरव चतुर्वेदी सोबत होते. सुरक्षा रक्षकांची गाडी मागे काही अंतरावर होती, त्यादरम्यान हा भ्याड हल्ला झाला, अशी संतप्त प्रतिक्रिया सलील देशमुख यांनी दिली.

सलील देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, काय म्हणाले ?

हा हल्ला झाल्यावर काटोल नरखेडच नव्हे तर संपूर्ण नागपूर जिल्हा या घटनेचा विचार करू लागला आहे. तुमच्या जिल्ह्यात हल्ले का होत आहे? अमित शहा यांचे दौरे का रद्द होत आहेत? हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा.. हे सगळं देवेंद्र फडणवीस स्वतः करत आहेत, असा माझा थेट आरोप आहे, असा आरोप सलील देशमुख यांनी केला.

भाजपकडून गंभीर आरोप, सलील देशमुखांचे प्रत्युत्तर -

अनिल देशमुख यांनी स्वत:च स्वत:वर हल्ला घडवून आणला, असा गंभीर आरोप माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी केला. त्याशिवाय त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले, अन् एकूणच प्रकरण संशयास्पद असल्याचं सांगितलं. फुकेंच्या आरोपाला सलील देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले.

सलील देशमुखांचे प्रत्युत्तर -

परिणय फुके हे देवेंद्र फडणवीस यांचे खास आहेत. त्यांच्यासारख्या दीड दमडी आमदाराला त्याला उत्तर देण्यास बांधिल नाही. काटोल मतदारसंघातील भाजप उमेदवार चरण सिंह ठाकुर यांना देवेंद्र फडणवीस यांचा वरदस्त असल्याने हे सगळे घडत आहे. काही दिवसापूर्वी चरण सिंह ठाकुर यांच्या व्यक्तीने एका व्यक्तीचा खून केला. एका मुलीवर अत्याचार झाला, अशा अत्याचार करणाऱ्याला या चरण सिंह ठाकुर यांनी आपल्या घरात शरण दिली होती हे जगजाहीर आहे.

विकास ठाकरेंची चौकशीची मागणी -

नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी या हल्ल्याचा निषेध केला. माजी गृहमंत्र्यावर अशा पद्धतीने हल्ला होत असेल हा कुठलाही स्टंट नसून याची सगळी चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली. अनिल देशमुख हे सध्या बोलू शकत नाही, डॉक्टरांनी त्यांना anesthesiya दिला आहे... टाके लावण्यात आल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली.

पोलीस काय म्हणाले ?

या प्रकरणात चौकशी सुरू केलेली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी काटोल शहरात दाखल झाले आहेत. अजून कुठलाही निष्कर्षावर पोहोचू शकले नाहीत. या घटनेचे सर्व सत्य लवकरच नागपूर ग्रामीण पोलीस समोर आणतील असे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

SCROLL FOR NEXT