Woman Alleges 9-Year physical Assault by Ex-Councillor Saam Tv News
महाराष्ट्र

माजी नगरसेवकाकडून तरूणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध, ९ वर्षांपर्यंत छळलं; नेमकं प्रकरण काय?

Woman Alleges 9-Year physical Assault by Ex-Councillor: लग्नाचं आमिष दाखवून माजी नगरसेवकाकडून नऊ वर्षांपर्यंत तरूणीवर अत्याचार. आरोपीच्या पत्नीकडून पीडितेला हातपाय तोडण्याची धमकी.

Bhagyashree Kamble

अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातून (मखरेवाडी) धक्कादायक बातमी समोर येत आहे. लग्नाचे आमिष दाखवून माजी नगरसेवकाने एका महिलेवर बलात्कार केला आहे. नऊ वर्षांपर्यंत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी पीडितेनं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, माजी नगरसेवकाच्या बायकोनं तरूणीला हात - पाय तोडून फेकून देईन, अशी धमकी दिली. हे प्रकरण समोर येताच श्रीगोंदा तालुका हादरला असून, माजी नगरसेवक आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरूणीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१६ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत या कालावधीत माजी नगरसेवक आरोपीनं तरूणीला आपल्या जाळ्यात ओढलं. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. लॉजमध्ये नेत शारीरिक संबंध ठेवले. आरोपीनं पीडितेच्या घरातही बळजबरीनं शरीरसंबंध ठेवले होते, अशी माहिती पीडितेनं दिली.

दरम्यान, आरोपीनं पीडितेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकी देत आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेनं सत्य बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तिला माजी नगरसेवकाने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाबाबतची माहिती पीडितेनं आरोपीच्या पत्नीला दिली.

आरोपीच्या पत्नीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. हात पाय तोडून फेकून देईन, अशी धमकी दिली. याच धमक्यांना कंटाळून पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच माजी नगरसेवक आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT