eknath shindes shivsena Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik Civic Elections: शिंदेंचा काँग्रेसला धक्का! शिवसेनेत इन्कमिंग सुरूच, काँग्रेसच्या शिलेदारांचा पक्षाला जय महाराष्ट्र

Eknath Shindes Shiv Sena: नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरू झालीय. काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.

Bhagyashree Kamble

स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींसाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय. लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार असून, राजकीय पक्षांनी याच पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. अनेक राजकीय खलबतं सुरू असताना, शिंदेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. नाशिकमध्ये माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राज्यातील अनेक तालुक्यांमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इतर पक्षातील नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. अलिकडेच नवी मुंबईतील ठाकरे गटाचे जिल्ह्याध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये देखील शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरू झाली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितित मुंबईत त्यांनी प्रवेश केला आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं बळ वाढल्याची चर्चा आहे. तसेच आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT