Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अख्या कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय आहे कारण?

Beed Latest News : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मस्के कुटुंबाकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.

विनोद जिरे

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मस्के कुटुंबाकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र वेळीच पोलीस प्रशासन दाखल झाल्यानं पुढील अनर्थ टळला आहे. अंगावर डिझेल अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी ग्रामपंचायत अंतर्गत 11 कामे करण्यात आली. मात्र त्याची 96 लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली आहे, असं मस्के कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरपंच शशिकला भगवान मस्के, मयुरी मस्के आणि बाळासाहेब मस्के या तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर डिझेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु याचदरम्यान पोलीस प्रशासन दाखल झाल्यानं पुढील अनर्थ टळला. मस्के कुटुंबाला शिवाजीनगर पोलीसांनी पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलं आहे. जवळपास तासभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा गोंधळ सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाची देखील धांदल उडाली होती.

तीन दिव्यांगांनीही केला आत्मदहनाचा प्रयत्न

दरम्यान, याआधी गुरुवारी यवतमाळमधील दिग्रस पालिकेच्या आवारात तीन दिव्यांगांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. कनिष्ठ लिपिकाला निलंबित करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कमुळे अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेतील शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकांनी दिव्यांगाचे बनावट प्रमाणात मिळवून नोकरी बळकावली असल्याचा आरोप आहे. याच कनिष्ठ लिपिकला निलंबित करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून केली जात होती. मात्र नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने टोकाचं पाऊल उचलत दिव्यांगांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT