Beed
Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमध्ये दहावीचा इंग्रजी पेपर फुटला; एका प्रश्नांची 20 रुपयांना झेरॉक्स

विनोद जिरे

बीड: बीडच्या (Beed) साक्षाळपिंप्री गावामध्ये शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल झालेला इंग्रजीचा (English) पेपर फुटला असून एका झेरॉक्स सेंटरवर एका प्रश्नाच्या उत्तराची झेरॉक्स (Xerox) 20 रुपयाला विकली जात होती. यावेळी सहाय्यक पोलीस (Police) अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकला असता, हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हे देखील पहा-

गेल्या 15 मार्चपासून इयत्ता 10 वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. काल 19 मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. या दरम्यान बीड (Beed) तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील केंद्रावर परीक्षा सुरू असताना, संजय मुरलीधर पालवे रा . उक्कडपिंप्री, ता. गेवराई याच्या झेरॉक्स सेंटरमधून उत्तरांच्या प्रती विक्री केले जात होते. यादरम्यान कुमावत यांच्या पथकाने झेरॉक्स सेंटरवर छापा (raid) टाकण्यात आला होता.

यावेळी प्रश्न क्र. 3 व 4 च्या झेरॉक्स प्रती 20 रुपयांना एक याप्रमाणे विक्री केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यादरम्यान झेरॉक्स चालकाला ताब्यात घेत, त्याच्याकडे मिळून आलेल्या, 2 प्रश्नांच्या प्रत्येकी 80 प्रती अशा एकूण 160 प्रतीसह झेरॉक्स यंत्रही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतं आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhuvan Bam: प्रसिद्ध युट्यूबर भुवनचं शाहरुखच्या पावलावर पाऊल; मुंबईत घेतलं नवकोरं घर

Side Effect Of Haldi Milk: हळदीचे दूध कोणी पिऊ नये?

Eye Care Tips : डोळ्यांना काजळ लावताना पसरते? या टिप्स फॉलो करा, डोळे दिसतील अधिक सुंदर

Vastu Tips: ऑफिसच्या टेबलवर या गोष्टी ठेवू नका; अन्यथा प्रगतीत येतील अडथळे

Today's Marathi News Live : पर्यटन मंत्री गिरीश महाजन झाले आजोबा; मुलगी श्रेया यांनी दिला बाळाला जन्म

SCROLL FOR NEXT