shivsena mp Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी ट्विटरवर दिली मोठी प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनायल विभाग (ईडी)ने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने (Enforcement Directorate) राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांवर करण्यात आला होता. राऊत (sanjay raut) ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, ईडीचं पथक राऊतांना ताब्यात घेवून मुंबईच्या ईडी कार्यालयात पोहचले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विटरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही त्या व्यक्तीचा पराभव करु शकत नाही, जो कधी हार मानत नाही. झुकणार नाही, जय महाराष्ट्र, असं ट्विट करुन राऊतांनी विरोधकांना सणसणीत इशारा दिला आहे.

संजय राऊत यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्ष करुन चौकशीचा ससेमीरा लावला. त्यामुळे ईडीने त्यांना ताब्यात घेणं अपेक्षित होतं. केंद्र सरकारच्या जुमली कारभाराविरोधात शिवसेना रान उठवल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. पत्राचाळ आर्थिक व्यवहारात जर काही गदारोळ झाला होता तेव्हाच राऊतांना ईडीने ताब्यात घ्यायचं होतं. ईडीने शिवसेनेच्या बुलंद आवाजाविरोधात कारवाई केलीय. अशा तपास यंत्रणांविरोधात शिवसेना आक्रमक भूमिका घेईल. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांचा नामोहरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना शिवसेना संपवायची आहे. पण संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

तर राऊतांवर कारवाई केल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, पत्राचाळ व्यवहारात संजय राऊत यांनी आर्थिक घोटाळा केला आहे. राऊतांची रवानगी आता तुरुंगात नवाब मलिक यांच्या बाजूच्या खोलीत व्हावी. तसेच संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यावर महिला शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्या असून राऊतांच्या घराबाहेर ठिय्या मांडला आहे. संजय राऊत अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणा देत शिवसैनिक महिला राऊतांना पाठिंबा दर्शवत आहेत. संजय राऊतांना आम्ही ईडीच्या ताब्यात जाऊ देणार नाहीत, त्यांना आधी आम्हाला सामोरं जावं लागेल. आमचा ईडीविरोधात ठिय्या असाच सुरु राहील, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. दरम्यान, राऊतांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडीच्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर दिलं असतं, तर संजय राऊतांवर अशी वेळ आली नसती, असं भाजपचे आमदार राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गेट ओलांडून घरात गेली अन् क्षणातच भिंत कोसळली; महिला थोडक्यात बचावली; VIDEO

IB Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

SCROLL FOR NEXT